प्रसिद्ध गायक Mika Singh शोधतोय आपला परफेक्ट लाइफ पार्टनर, टीव्हीवर लवकरच स्वयंवर सारखा शो येणार प्रेक्षकांच्या भेटीला
गायक मिका सिंग (फोटो सौजन्य- ट्विटर)

राष्ट्रीय टेलिव्हिजनवर आतापर्यंत काही सेलिब्रेटीजने आपल्या लाइफचा परफेक्ट पार्टनर शोधण्यासाठी काही रिअॅलिटी शो प्रसारित केले बोते. यापूर्वी रतन राजपूत, राखी सावंत सारख्या प्रद्धिध कलाकारांनी सुद्धा स्वंयवर या रिअॅलिटी शो च्या माध्यमातून आपला लाइफ पार्टनर निवडला होता. अशातच आता बॉलिवूड मधील प्रसिद्ध गायक मीका सिंह (Mika Singh) सुद्धा एका रिअॅलिटी शो च्या माध्यमातून आपली पार्टनर शोधणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

एका रिपोर्ट्सनुसार मीका सिंह टीव्हीवर आपल्या स्वंयवरच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ईटाइम्सच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रिअॅलिटी शो यापूर्वी झालेल्या स्वयंवर सारखाच असणार आहे. येत्या काही महिन्यात हा शो प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (Adipurush: प्रभासचा 'हा' चित्रपट कोणत्या दिवशी होणार प्रदर्शित? निर्माता भूषण कुमार यांची माहिती)

सुत्रांनी पुढे असे म्हटले की, मीका सिंह शो मध्ये लग्न नाही करणार पण अॅगेजमेंट केल्यानंतर नाते पुढे नेणार असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत या शो मध्ये एन्ट्री करण्यासाठी मीका हा अधिकच उत्साही आहे. देभरातील कंटेस्टेंट्स या शो चा हिस्सा बनवणार आहेत.

सेलिब्रेटींच्या स्वयंवरच्या शो ला खुप जणांनी पसंद केले होते. तसेच राखी सावंत, रतन राजपू आणि मल्लिका शेरावत यांनी यामध्ये लग्न केले नव्हते. तर राहुल महाजन याने बंगाली मॉडल डिम्पी गांगुली हिच्यासोबत विवाह केला होता. परंतु 4 वर्षानंतर ते दोघे विभक्त झाले. पण आता मीका सिंह याला त्याच्या शो मध्ये लाइफ पार्टनर मिळतो का हे पाहणे फार उत्सुकतेचे असणार आहे.