Amitabh Bachchan यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे यांची कमाई ऐकून व्हाल थक्क; पहा किती आहे सॅलरी
Amitabh Bachchan | (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यांच्याबद्दल समोर येणारी नवनवी माहि ती त्यांच्या लोकप्रियतेत भर घालत असते. यामुळे ते सातत्याने चर्चेत राहतात. काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्मा यांचे बॉडीगार्ड किती कमाई करतात, याबद्दल अपडेट्स समोर आले होते. त्यानंतर आता महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा पर्सनल बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) यांच्या कमाई समोर आली आहे. यांच्या वेतनाचा आकडा थक्क करणारा आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र वर्षाला दीड कोटी रुपये कमवतात. (Anushka Sharma चा बॉडीगार्ड प्रकाश सिंह घेतो गलेलठ्ठ पगार; ऐकून तुम्हीही व्हाल चकीत)

जितेंद्र शिंदे यांची सिक्युरीटी एजन्सी देखील आहे. परंतु, अमिताभ यांच्या सुरक्षेसाठी ते स्वत: हजर असतात. अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील अत्यंत मोठे नाव. त्यांचा चाहतावर्गही जबरदस्त आहे. अशावेळी त्यांच्या सुरक्षेची अत्यंत मोठी जबाबदारी जितेंद्र यांच्यावर आहे. (FIAF Award 2021: महानायक अमिताभ बच्चन ठरले 'एफआयएएफ पुरस्कार' मिळवणारे पहिले भारतीय; सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद)

दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा चेहरे सिनेमा काही दिवसांत सिनेमागृहात रिलीज होईल. यात अमिताभ पहिल्यांदाच इमरान हाशमी सोबत काम करणार आहेत. रुमी जाफरी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ओटीटी ऐवजी सिनेमागृहात सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस होता. मात्र कोविड-19 संकटामुळे प्रदर्शनासाठी सिनेमाने दीर्घकाळ प्रतिक्षा केली आहे. याशिवाय टीव्ही वरील लोकप्रिय रियालिटी शो 'कौन बनेगा करोडपति'च्या 13 व्या सीजनलाही सुरुवात झाली आहे.