Amitabh Bachchan | (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मुंबई मेट्रोला (Mumbai Metro) पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण तापले असून नेटकऱ्यांनी सोशल मीडियात अमिताभ बच्चन यांच्या विरोधात टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मुंबई मेट्रोमुळे अमिताभ बच्चन यांना विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही लोकांनी बच्चन यांच्या जलसा या बंगल्याच्या बाहेर मोर्चासुद्धा काढण्यात येत आहे. तर जाणून घ्या नेमके प्रकरण काय आहे आणि लोक अमिताभ बच्चन यांना का विरोध करत आहेत?

खरतरं, अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रो प्रदूषण रहित असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले होते. त्यानंतर मुंबई मेट्रोने त्यांचे आभार मानले होते. परंतु मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे कापून तेथे मेट्रोसाठी कारशेड उभारण्यात येणार असल्याच्या निर्णयाला महापालिकेकडून मंजूरी देण्यात आली आहे.

संपूर्ण मुंबईकर या प्रकरणी संताप व्यक्त करत असून मुंबई मेट्रोचा विरोध करत आहेत. याच स्थितीत अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला दर्शवलेला पाठिंबा चुकीचा असल्याचे म्हटले जात आहे.तर अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत मेट्रोला पाठिंबा दिल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकांनी असे म्हटले आहे की, एका बाजूला तुम्ही झाडे लावण्यासाठी सांगत आहात तर दुसऱ्या बाजूला मुंबई मेट्रोला साथ देत आहात. परंतु मेट्रोसाठी झाडे कापणे हा यामधील महत्वाचा मुद्दा आहेच. तर मेट्रोमुळे वेळ लोकांचा प्रवासादरम्यानचा वेळ तर वाचत आहे. पण आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. त्यामुळे मेट्रोसाठी झाडे कापल्यास त्यांची संख्या तर कमी होणार आहेत. त्याचसोबत आरोग्यासंबंधित आजार सुद्धा वाढीस लागणार आहेत.(अदित्य ठाकरे यांच्याकडून आरे जंगलाचे समर्थन; म्हणाले, शिवसेनेचा मेट्रोला नाही तर, कारशेडला विरोध)

मुंबई मेट्रोच्या उभारणीसाठी आरे मधील झाडे कापण्यासाठी सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत यासाठी विरोध दर्शवला आहे. तर मु्ंबई महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णय चुकीचा असून त्यासंबंधित सोशल मीडियात त्याच्या विरोधात पोस्ट लिहिल्या जात आहेत.