चिंता करू नका, मी आई आणि घराची काळजी घेईन; जाणून घ्या अभिषेक बच्चन यांनी का लिहलं अमिताभ बच्चन यांना अशा आशयाचं पत्र?
Amitabh, Abhishek Bachchan (PC - Facebook)

बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह  असतात. बिग बींनी नुकतेच ट्विटद्वारे एका पत्राचा फोटो शेअर केला आहे. हे पत्र त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने लिहलं आहे. या पत्रात अभिषेक त्याचे वडील अमिताभ बच्चन यांना तुम्ही चिंता करू नका. मी आई जया बच्चन, बहीण श्वेता बच्चन आणि घराची काळजी घेईन, असा विश्वास व्यक्त केला आहे. अभिषेकने लिहिलेलं हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे अभिषेकने लिहिलेलं हे पत्र भलतचं व्हायरल होतंय.

परंतु, अभिषेकने हे पत्र बिग बी रुग्णालयात असताना लिहिलेलं नसून ते चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते, त्यावेळी लिहिलेलं आहे. अभिषेक आपल्या वडिलांना त्यावेळी खूपच मिस करत होता. त्यामुळे अभिषेकने हे पत्र लिहिले आहे. या पत्रात अभिषेकने, प्रिय बाबा, तुम्ही कसे आहात? आम्ही सर्व ठिक आहोत आणि मला तुमची खूप आठवण येत आहे. तुम्ही लवकर घरी या... बाबा मी देवाकडे तुमच्या आनंदासाठी प्रार्थना करत आहे आणि देव माझी प्रार्थना ऐकत आहे. तुम्ही चिंता करू नका मी आई, दीदी आणि घराची काळजी घेईन. मी कधी-कधी खूप मस्ती करतो. परंतु मी तुमच्यावर खूप प्रेम करतो बाबा. तुमचा लाडका मुलगा अभिषेक, असं म्हटलं आहे.

हेही वाचा - छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख संदर्भात अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी; म्हणाले...

दरम्यान, बिग बींनी अभिषेकचं हे पत्र शेअर करताना सांगितलं आहे की, हे पत्र अभिषेकने तेव्हा लिहिलं आहे, जेव्हा मी खूप जास्त काळासाठी घरापासून दूर होतो. ‘पूत सपूत तो क्‍यों धन संचय; पूत कपूत तो क्‍यों धन संचय', असंही बिग बींनी म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट - 

तसचं अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अभिषेकनेही कमेंट केली आहे. अभिषेकने मी हे पत्र लेखनाचा कोर्स करण्यापूर्वी लिहिलं होतं, असं सांगितलं आहे.

अभिषेक बच्चन ट्विट - 

गेल्या काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2 आठवड्यांपूर्वी बिग बींनी चित्रपटसृष्टीत 50 वर्ष कारकिर्द पूर्ण केली. बिग बींनी आतापर्यंत अनेक दमदार भूमिका पार पाडल्या. अमिताभ यांचा 'गुलाबो सिताबो' हा चित्रपट 24 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील अमिताभ यांचा लूक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.