कोन बनेगा करोडपती (Kaun Banega Karodpati) या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji) एकेरी उल्लेख करण्यात आला होता. यावर या कार्यक्रमाचे सुत्र संचालक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवप्रेमींची माफी मागितली आहे. तसेच कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, शिवप्रेमींनी सोनी वाहनी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. एवढेच नव्हेतर, काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोनी वाहिनीवर बहिष्कार टाका अशी मागणी केली होती. अनेकांनी हा हिंदू राजाचा अपमान सहन केला जाणार नाही असेही म्हटले होते.
कोन बनेगा करोडपती पर्व-11 च्या भागात यांनी एक प्रश्न विचारला होता. यावेळी या कार्यक्रमाचे सुत्र संचालक अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी उल्लेख केला यावर शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत सोनी वाहीनी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर ताशेरे ओढले होते. तसेच अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात माफी मागावी, अशी मागणी केली होती. यावर आज अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनेकांची माफी मागितली होती. त्यावेळी ते म्हणाले की, कोणलाही दुखवण्याचा आमचा प्रयत्न नव्हता, ज्या लोकांचे मन दुखावले गेले आहेत, अशा लोकांची आम्ही माफी मागतो. असे ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- अखेर Sony TV ला आली जाग; 'छत्रपती शिवाजी महाराज' यांच्या नावाचा अपमान केल्या प्रकरणी ने मागितली माफी
अमिताभ बच्चन यांचे ट्वीट-
No disrespect meant at all .. apologies if it has hurt sentiments .. 🙏 https://t.co/ynPav4DYfO
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 8, 2019
दरम्यान, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन, सोनी वाहिनी, मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.#Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅग भारतामध्ये ट्विटवर नवव्या क्रमांकाला ट्रेण्ड होत होता. 9 हजारहून अधिक जणांनी हा हॅशटॅग वापरून ट्विट केले होते.