Amitabh Bachchan यांनी घेतला अवयवदानाचा निर्णय; सोशल मीडियावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Amitabh Bachchan (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांनी आपल्या दमदार अभिनय, नृत्यशैली, आवाज याद्वारे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. सुपरस्टार असलेल्या बिग बी (Big B) यांनी खऱ्या आयुष्यात घेतलेल्या एका निर्णयामुळे चाहत्यांच्या मनातील त्यांचे स्थान अधिकच अढळ होणार आहे, यात शंका नाही. अमिताभ बच्चन यांनी अवयवदान (Organ Donation) करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती खुद्द बिग बी यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. यापूर्वी सामाजिक भान जपत अमिताभ बच्चन यांनी गरजू, पीडितांना आर्थिक मदत केली होती. आता धनासह तन ही दान करण्यास बिग बी तयार झाले आहेत. (Amitabh Bachchan To Be Alexa's Voice: अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आता तुमच्याशी बोलणार एलेक्सा, 'हे' असेल या डिवाईसचे नाव)

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बिग बीं नी कोटावर हिरव्या रंगाची रिबन बांधली आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, "मी अवयव दानाची शपथ घेतली आहे. याची पवित्रता दर्शवणारी हिरवी रिबन मी बांधली आहे."

Amitabh Bachchan Tweet:

अमिताभ बच्चन यांच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बिग बींच्या निर्णयाचा आदर करत अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

पहा चाहत्यांच्या प्रतिक्रीया:

कोरोना व्हायरस संसर्गावर मात केल्यानंतर बीग बींनी केबीसी 12 च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान, कोविड-19 संकटामुळे या शो मध्ये खूप बदल दिसून येत आहेत. सेटवर प्रेक्षकांशिवाय शूटिंग केले जात आहे. त्याचबरोबर ऑडियन्स पोल लाईफलाईन देखील हटवण्यात आली आहे.