
बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपल्या अभिनयासह आपल्या दमदार आवाजाने त्यांनी न केवळ बॉलिवूडमध्ये तर हॉलिवूडमध्येही त्यांनी आपली छाप सोडली आहे. त्यांचा आवाज ही त्यांची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या आवाजाची भुरळ अनेकांच्या घरात असलेल्या Alexa बाईंना देखील पडली आणि अखेरीस अॅमेझॉन (Amazon) कंपनीने अमिताभ बच्चन यांच्याशी भागीदारी केली. याचाच परिणाम आता तुम्हाला लवकरच तुमची लाडकी अॅलेक्सा अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बोलणार आहे. भारतात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या व्हॉईस असिस्टंट सर्विस Alexa मध्ये आता बिग बींचा आवाज ऐकायला मिळणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अॅलेक्सासाठी स्वत:चा आवाज देणारे अमिताभ बच्चन हे पहिले भारतीय कलाकार ठरले आहेत. या डिवाईसचे नाव असेल 'बच्चन एलेक्सा'. ज्यात बिग बींच्या आवाजात हास्यविनोद, हवामान अंदाज, सल्ला, शायरी, कविता सारख्या अनेक गोष्टी ऐकायला मिळतील.
हेदेखील वाचा- Alexa च्या माध्यमातून आता बिलाचे पैसे भरता येणार, जाणून घ्या कसे?

ही सेवा 2021 मध्ये सुरु होईल ज्यात ग्राहकांसाठी ठराविक शुल्क आकारले जाईल. अॅमेजॉनचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला याची एक झलक ऐकायची असेल तर तुमच्या एलेक्साला ऑन करुन सांगा, "Alexa, say hello to Mr. Amitabh Bachchan."
या नव्या भागीदारीबद्दल अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे की, "टेक्नोलॉजीन ने नेहमी मला नवनव्या गोष्टींशी जोडले आहे. मग तो चित्रपट असो, टीव्ही शो असो वा पॉडकास्ट. त्यामुळे या सेवेमध्ये माझा आवाज एलेक्साला देण्याबात मी जितका खूश आहे तितकाच उत्साही देखील. या व्हॉईस टेक्नोलॉजीने मी चाहत्यांशी आणखी जोडला जाईल."