
अभिनेता सोनू सूद यांच्यानंतर आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी महाराष्ट्रात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेश च्या मजूरांना (Migrant Labourers) त्यांच्या मूळगावी पोहोचवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या AB Corp Ltd टीम तर्फे प्रवासी मजूरांनी मुंबईतून उत्तर प्रदेशला पोहचवण्यासाठी खास बस सोडण्यात आल्या आहेत. काल 28 मे रोजी मुंबईतील हाजी अली ज्यूस सेंटर येथून उत्तर प्रदेशसाठी 10 बस रवाना झाल्या आहेत. यापूर्वी सुद्धा अमिताभ यांनी मुंबईत 20 हजार पीपीई किट्स आणि फुड पॅकेट्सचे वाटप केले होते.
पहा फोटो






Mrunmayee Deshpande Birthday: अभिनेत्री मृण्मयी देशपांडे बद्दल जाणून घेऊयात काही खास गोष्टी - Watch Video
दुसरीकडे, अभिनेता सोनू सूद ने आतापर्यंत महाराष्ट्रात अडकलेल्या अनेक मजूरांना त्यांच्या गावी पोहोचवले आहे. जोपर्यंत सर्व मजूर आपल्या गावी पोहोचत नाहीत तोपर्यंत मदत कमी पडू देणार नाही, अशी भूमिका घेऊन सोनू सूद दिवसागणिक शेकडो गरजूंपर्यंत आपली मदत पोहचवत आहे. सोनू सोबतच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सुद्धा असेच मदतकार्य आरंभले आहे.