'अमिताभ बच्चन' यांनी वन टेक मध्ये पूर्ण केला 14 मिनिटांचा सीन, 'चेहरे' सिनेमाच्या टीम ने टाळ्या वाजवत केलं कौतुक
अमिताभ बच्चन (Photo Credits: Twitter)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  यांना महानायक का म्हणतात याचं अगदी योग्य उत्तर देणारा प्रसंग अलीकडे एका सिनेमाच्या सेट वर घडला. बिग बी आपल्या येऊ घातलेल्या सिनेमा चेहरे (Chehare) साठी शूटिंग करत असताना त्यांनी तब्बल 14 मिनिटांचा एक सीन एका टेक मध्ये पूर्ण करून दाखवला. जिथे दोन वाक्यांसाठी अगदी मातब्बर मंडळींना सुद्धा वारंवार टेक घ्यायची गरज लागते तिथे अमिताभ यांचा हा परफॉर्मन्स बघून सिनेमाची टीम निरुत्तरित झाली. आणि मग त्यानंतर सेटवर केवळ टाळ्यांचा कडकडाट ऐकू येऊ लागला. या प्रसंगाविषयी सिनेमाचे साउंड डिझायनर रसेल पोकटी (Resul Pookutty) यांनी ट्विट करून माहिती दिली या ट्विट मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांनी आज एक नवा विक्रम रचला आहे असे सुद्धा म्हंटले आहे.

पहा बिग बी यांच्या विक्रमाची माहिती देणारे ट्विट

चेहरा या सिनेमाच्या पहिल्या शेड्युलच्या शूटिंगचा हा शेवटचा दिवस होता ज्यामध्ये बिग बी यांचा १४ मिनिटांचा एक सीन होता. हा पूर्ण सीन केवळ एका टेक मध्ये अमिताभ यांनी पूर्ण केला याविषयी कौतुक करत रसेल यांनी काही फोटो शेअर केले आहेत. रसेल यांच्या या कौतुकावर अमिताभ यांनी " मी काही मोठं केलेलं नाही तुम्ही माझे खूप कौतुक करत आहात" असं विनम्र उत्तर दिलं आहे . सिरियल किसर इम्रान हाश्मी पहिल्यांदाच करणार बिग बींसोबत स्क्रीन शेअर

अमिताभ बच्चन ट्विट

सध्या बिग बी चेहरा सिनेमा साठी शूटिंग करत आहेत.या सिनेमात कृती खारबंद आणि इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत आहेत. तर आनंद पंडित याचे दिग्दर्शक आहेत. यानंतर अमिताभ बच्चन रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि मौनी रॉय यांच्यासोबत 'ब्रह्मास्त्र' सिनेमात देखील पाह्यला मिळू शकतात.