
आज महाराष्ट्रभरामध्ये दसर्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून पोलिसांपर्यंत आणि अगदी सेलिब्रिटींनीही विविध स्वरूपात विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चनच्या शुभेच्छा
T २९६७ - उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा!!🌹🌹
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छl !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 18, 2018
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा!!
असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या अमिताभ बच्चन नागराज मंजुळेच्या सिनेमामध्ये काम करत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून आमिर खान आणि अमिताभ पहिल्यांदा रसिकांना एकत्र पहायला मिळणार आहेत.