मुंबईच्या पावसात सलमान खान सायकलस्वारी करत पोहचला 'दबंग 3' च्या सेटवर (Watch Video)
Salman Khan (Photo Credits: Twitter)

मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची धूम आणि त्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी बसरत असल्याने मुंबईकरांची सध्या दैना उडाली आहे. पण 24X7 जागणारी आणि काम करणारी मुंबई अशाच कोणत्याच अडथळांनी थांबत नाही. मग याला बॉलिवूड आणि सेलिब्रिटीदेखील अपवाद नाही. मुंबईच्या ट्राफिकमधून रस्ता काढत ऐन पावसात बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान देखील बाहेर पडला. काल(6 सप्टेंबर) दिवशी सलमान खान पावसात सायकल चालवत बाहेर पडला आणि दबंग 3 च्या सेट्सवर पोहचला. सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर त्याचा खास व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

सलमान खान सध्या 'दबंग 3' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या त्याचं शुटिंग मुंबईत पार पडत आहे. या सिनेमात सलमान खान सोबत सोनाक्षी सिन्हा झळकणार आहे. तर प्रभू देवा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. 20 डिसेंबर 2019 ला दबंग 3 हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. दबंगच्या मागील 2 सिक्वेंसना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आता तिसर्‍या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.

सलमान खान ट्वीट

सलमान खान त्याच्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून अनेक लहान मोठ्या गोष्टी शेअर करत असतो.