चेक बाउंस प्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेल हिच्या विरोधात कोर्टाने जाहीर केले अटक वाॅरंट
अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) हिच्या विरोधात रांची कोर्टाने अटक वॉरंट जाहीर केले आहे.  प्रोड्युसर अजय कुमार याने दीड लाख करोड रुपयंचा चेक बाउंस झाल्याचा आरोप अमिषावर लावण्यात आला आहे. अजय याने असे म्हटले आहे की, 2018  मध्ये चित्रपट देसी मॅजिक दरम्यान 3 करोड रुपये उधारीवर दिले होते. मात्र जेव्हा अमिषा हिच्याकडे पैसे मागितल्यास तिने ते देण्यास टाळाटाळ करत होती.
त्यानंतर चित्रपट जास्तकाळ बॉक्सऑफिसवर न चाल्यानंतर पुन्हा पैसे मागितले त्यावेळी ही प्रोड्युसरने त्याबाबत अमिषा हिला सांगितले. यावर अमिषाने दीड लाख करोड रुपयांचा चेक प्रोड्युसरला देऊ केला. परंतु जेव्हा चेक बँकेत वटवण्यासाठी आणल्यानंतर तो बाउंस झाल्याचे समोर आले. या प्रकरणी अमिषा हिच्या विरोधात रांची कोर्टात फसवणूकीच्या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. अजय यांनी असे म्हटले आहे की,  या प्रकरणी तिच्यासोबत संपर्क करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु अद्याप कोणतीही प्रतिक्रिया अमिषा हिच्याकडून आलेली नाही.
अमिषाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणावर कोर्टाकडून समन्स सुद्धा पाठवण्यात आले. फसवणूकीच्या प्रकरणात आलेली अमिषा एके काळी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. अमिषा हिच्यावर असा ही आरोप आहे की पैसे मागण्यावरुन मशहूर लोकांसोबत आपले फोटो दाखवून त्यांना धमकावल्याचा ही आरोप आहे. यापूर्वी ही अमिषावर अनेक आरोप लावले आहेत.