Amazon Forest Fire (Photo Credit-Twitter)

दक्षिण अमेरिका मधील ब्राझीलच्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला (Amazon Forest) भीषण आग लागली आहे. अ‍ॅमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात मोठे रेनफॉरेस्ट म्हणून ओखळले जाते. यापूर्वी सुद्धा या जंगलाला आग लागल्याची घटना घडली होती. मात्र आता लागलेल्या आगीमुळे ब्राझील मधील साओ पाउलो धुरामुळे अंधारात गेले आहे.

या जंगलातील झाले 20 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करतात. येथे गेल्या 16 दिवसांपासून लागलेल्या आगीमुळे ही स्थिती पर्यावरणासाठी भयंकर आहे. या प्रकरणावर अद्याप आंतरराष्ट्रीय मीडियाने खासकरुन लक्ष दिले नाही आहे. परंतु बॉलिवूड कलाकारांनी जंगलाला लागललेल्या या भीषण आगीमुळे आवाज उठवला आहे. तसेच सोशल मीडियात या प्रकरणी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अनुष्का शर्मा हिने इंन्स्टाग्रामवर या जंगलाला लागलेल्या आगीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच फोटोखाली घडलेला हा प्रसंग फारच गंभीर असून सोशल मीडियात याबद्दल जास्क करुन लक्ष द्यायला हवे. #saveamazon

तर अर्जुन कपूर याने असे म्हटले आहे की, अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग ही घटना भयंकर आहे. मी विचार ही करु शकत नाही याचा परिणाम जगावर आणि पर्यावरणावर काय होईस. ही एक अत्यंत वाईट गोष्ट आहे. #PrayforAmazons

दिशा पाटनी हिने असे म्हटले आहे, भयंकर स्थिती आहे अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला आग लागणे. पृथ्वीवर 20 टक्के ऑक्सिजन या जंगलातील झाडांमुळेच तयार होतो. गेल्या 16 दिवसांपासून या जंगलात आग लागली आहे तरी मीडिया शांत का आहे? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

अॅमेझॉन आणि रोंडानिया मधील राज्यात लागलेल्या आगीमुळे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ती अधिक पुढे पसरत गेली. तसेच सोशल मीडियात या घटनेचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत.