The Family Man 2 वेबसीरिजच्या रिलीज डेट संदर्भात नवीन अपडेट; अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने वापरकर्त्याला दिलं 'हे' उत्तर
The Family Man 2 (PC - Twitter)

चाहते अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील वेब सिरीज 'द फॅमिली मॅन'च्या (The Family Man 2) दुसर्‍या सीझनची आतुरतेने वाट पाहात आहेत. मालिकेच्या प्रदर्शनाच्या तारखेस येणार्‍या अपडेटवर चाहत्यांचे बारीक लक्ष असते. त्याचवेळी, या मालिकेचा दुसरा सीझन कधी येणार, यासंदर्भात अॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडिया अकाउंटवरील चाहते सतत प्रश्न विचारत असतात. तथापि, अलीकडेचं एक बातमी आली की, पुढील महिन्यात द फॅमिली मॅन सीझन 2 प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

मात्र, अद्याप या सीरिजची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु अ‍ॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर यासंदर्भात गोंधळ सुरू झाला आहे. गुरुवारी प्राईम व्हिडिओने 'फॅमिली मॅन'ची काही छायाचित्रे पोस्ट केली, ज्यात मनोज बाजपेयी आणि प्रियामणि यांच्या काही मुख्य भूमिका दाखवण्यात आल्या. बर्‍याच सोशल मीडिया वापरकर्त्यांना या मालिकेची रिलीज डेट जाणून घ्यायची आहे. (वाचा -पंतप्रधान होण्याच्या प्रश्नावर Sonu Sood ने दिले हटके उत्तर (Watch Video))

चाहत्यांनी विचारलेल्या या प्रश्नावर अॅमेझॉन प्राईमने उत्तर दिले की, उन्हाळ्यात सीझन 2 चा प्रीमियर येईल. त्याच वेळी, लेट्स ओटीटीने ट्विटरवर दावा केला आहे की, द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन 11 जून रोजी येऊ शकतो. त्यात म्हटले आहे की, हिंदी, तामिळ, तेलगू आणि इंग्रजी भाषांमध्ये डबिंगचे काम पूर्ण झाले असून सीझन 2 सर्व भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होईल.

दुसरीकडे, पहिल्या सीझनमध्ये मनोज बाजपेयी यांच्या टीम ऑफिसरच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता सनी हिदुजाने जागरण डॉट कॉमशी बोलताना सांगितले की, दुसऱ्या सत्रातील अधिकृत माहिती लवकरचं येऊ शकेल.

द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन प्रथम 12 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु तांडव सीरिजवरून झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम थांबविण्यात आला. त्यानंतर या सीरिजचा दुसरा सीझन मे महिन्यात येणार असल्याच्या बातम्या आल्या. द फॅमिली मॅनचा पहिला सीझन 20 सप्टेंबर 2019 रोजी प्रदर्शित झाला. या गुप्तचर थ्रिलर मालिकेत मनोज बाजपेयी टी.ए.एस.सी. या गुप्तहेर संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक श्रीकांत तिवारी यांची भूमिका साकारली आहे.