शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. महाराष्ट्राचे राजकारण सध्या अशांततेच्या काळातून जात आहे. राज्य मंत्रिमंडळही बरखास्त करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. बहुमत सिद्ध होण्याच्या एक दिवस आधी संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि पाठिंबा दिला. सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनीही ट्विटरवर (Twitter) उद्धव ठाकरेंचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे.
बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले- 'सर तुम्ही खूप चांगले काम केले! ...आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या प्रकारे राज्य काम केले त्यासाठी महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील… चाणक्य आज लाडू खात असेल… पण तुमचा प्रामाणिकपणा जास्त काळ टिकेल… तुम्हाला आणखी बळ मिळेल!’ (हे देखील वाचा: Atal Film Motion Poster: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कहाणी मोठ्या पडद्यावर; समोर आले मोशन पोस्टर; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित (Watch Video)
Tweet
You did great dear sir @OfficeofUT … and I’m sure people of Maharashtra will stand by you for the way you handled the state.. the Chanakya s may eat laddoos today.. but your genuinity will linger longer .. more power to you.. #justasking
— Prakash Raj (@prakashraaj) June 29, 2022
सर्वोच्च न्यायालयाने 30 जून रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आदेश कायम ठेवत महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर बोलताना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी राज्यातील सर्व आमदारांना सूचित केले आहे की राज्यपालांच्या आदेशानुसार आता फ्लोअर टेस्टची गरज नाही, त्यामुळे आजचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार नाही. उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि त्यांच्या MLC पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली त्यानंतर राज्यापालांनी आमदारांना ही माहिती दिली आहे.