Alia Bhatt Birthday Special: अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आज 15 मार्च रोजी तिचा 26वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच सध्या आलिया रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ह्याच्या सोबत रिलेशनशिप्समध्ये आहे. तर बॉलिवूडमध्ये अशी चर्चा आहे की, रणबीर आणि आलिया लवकरच लग्न करणार आहेत. परंतु आलिया हिच्या अफेर्सबद्दल बोलायचे झाले तर तिचे या पूर्वी 5 अफेअर्स होते त्या बद्दल तुम्हाला माहिती आहे का?
आलिया हिचा पहिला बॉयफ्रेंड रमेश दुबे नावाच्या तरुणासोबत होते. तर रमेश हा आलिया हिचा क्लासमेट होता. रमेश आणि आलिया एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांचे चांगले एकमेकांसोबत जमायचे. तसेच आलिया हिला सर्वात प्रथम अली ददारकर ह्याला पाहून प्रेमाची भावना निर्माण झाली होती. चित्रपटात येण्यापूर्वी आलिया अली ह्याला डेट करत होती. तसेच या दोघांचे नाते खुप काळ टिकून होते. कॉफी विथ करण या शोमध्ये वरुण धवन ह्याने आलियाचे अली सोबतच्या नात्याचा खुलासा केला होता.
मध्यंतरी आलिया बाबत अशी बातमी समोर येत होती की, कविन मित्तल ह्याला सुद्धा ती डेट करत होती. आलिया आणि कविन यांची गाठभेट एका सेमिनार मध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाल्यावर एकमेकांना डेट करत होते. कविन मित्तल हा प्रख्यात उद्योगपती सुनील मित्तल यांचा मुलगा आहे.
त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत आलियाचे प्रेमसुत जुळले होते. आलिया आणि सिद्धार्थ यांचे नाते अधिक काळ टिकून होते. 'स्टूडंट ऑफ द ईयर' या चित्रपटापासून या दोघांचे अफेअर्स सुरु झाले होते. त्यानंतर आलिया आणि सिध्दार्थ कपल पार्टी ते विविध कार्यक्रमांना एकत्रित उपस्थिती लावत असताना ही दिसून आले आहेत. मात्र काही कारणांमुळे या दोघांचे नाते टिकू शकले नाही आणि ब्रेकअप झाले. परंतु सध्या आलिया रणबीर कपूर ह्याच्या सोबत रिलेशनशिप्स असल्याने सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. रणबीर आणि आलिया लवकरच 'ब्रम्हास्र' या चित्रपटातून एकत्र दिसून येणार आहेत. येत्या 20 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.