आज संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण अगदी उत्साहात साजरा केला जात आहे. भावा-बहिणीच्या प्रेमाचा हा सण अगदी खास आहे. भावा बहिणीच्या नात्यावर आधारीत अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत अक्षय कुमार याने या सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'रक्षा बंधन' सिनेमाच्या पोस्टर मध्ये अक्षय कुमार आपल्या चार बहिणींसह दिसत आहे. विशेष म्हणजे या पोस्टरवर चारही बहिणींचा चेहरा दिसत नाही.
हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत अक्षय कुमार याने लिहिले, "या सिनेमाची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे. त्यामुळे करिअरमध्ये पहिल्यांदाच मी सिनेमाची कथा ऐकताच सिनेमा साईन केला. हसवणारी आणि रडवणारी अशी ही कथा आहे. त्याचबरोबर ज्यांना बहिण असते ते किती भाग्यवान असतात हे सांगणारी या सिनेमाची कथा आहे." (बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ने मुंबई पोलिसांना केले 'फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइस'चे वाटप; आदित्य ठाकरे यांनी मानले आभार)
पहा सिनेमाचे पोस्टर:
हा सिनेमा पुढील वर्षी 5 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होईल. या सिनेमाची निर्मिती आनंद एल राय यांनी केली आहे. अतरंगी रे या सिनेमानंतर दुसऱ्यांना अक्षय कुमार आणि आनंद एल. राय यांनी एकत्रित काम केले आहे.