Akshay Kumar equips Mumbai Police with heath-tracking device (PC- Twitter)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमी सामाजिक कार्यात तत्पर असतो. अक्षय कुमारने यापूर्वी लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक गरजूना मदतीचा हात पुढे केला होता. तसेच त्याने कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी मोठा निधी दिला होता. अशाचं प्रकारच्या सामाजिक कार्यामुळे अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अक्षय कुमारने मुंबई पोलिसांना फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचे (Fitness Health Tracking Device) वाटप केले आहे. त्याच्या या सामिजिक कार्याची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दखल घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरून अक्षयचे आभार मानले आहेत. (हेही वाचा - सुशांत सिंह राजपूत याच्या बँक अकाऊंटमधून 90 दिवसांत रिया चक्रवर्तीने खर्च केले 3 कोटी रुपये; बिहार पोलिसांच्या सूत्रांनी दिली माहिती- रिपोर्ट्स)

या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की, अक्षय कुमार यांनी मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचे वाटप केले आहे. या डिवाइसमुळे पोलिसांच्या शरीराचं तापमान, ऑक्सिजनची क्षमता, हृदयाचे ठोके तपासता येणार आहे. अक्षय कुमारने कोरोना संकटाच्या काळात देशातील सशस्त्र दल, वेगवेगळ्या राज्यातील पोलीस दल यांना पाठिंबा दिला आहे. देशातील कोरोना योद्धांची काळजी घेतल्यामुळे तुमचे मनापासून धन्यावद!

अक्षय कुमारप्रमाणेचं सोनू सूदनेदेखील लॉकडाऊन काळात गरजूंना मोठी मदत केली आहे. दरम्यान, अक्षय कुमारच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं म्हटलं तर, लवकरचं त्याचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.