सुशांत सिंह राजपूत याच्या बँक अकाऊंटमधून 90 दिवसांत रिया चक्रवर्तीने खर्च केले 3 कोटी रुपये; बिहार पोलिसांच्या सूत्रांनी दिली माहिती- रिपोर्ट्स
Sushant Singh Rajput, Rhea Chakraborty (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्या प्रकरणाबाबत नवनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहे. सुशांतचे वडिल के.के.सिंह (K.K Singh) ने पाटनामध्ये रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) विरोधात FIR दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले. बिहार पोलिससुद्धा या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. सुशांतचे बँक अकाउंटदेखील तपासले जात आहेत. रिया आणि तिच्या कुटूंबियांवर मनी लाँडरिंगची केस दाखल करण्यात आली आहे. आता आलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, रियाने 90 दिवसांत सुशांतच्या अकाउंटमधून 3 कोटी रुपये खर्च केले आहेत.

CNN न्यूज 18 ने दिलेल्या रिपोर्टनुसार, बिहार पोलिसांनी सांगितले की, सुशांतच्या खात्यामधून रियाने 90 दिवसांत 3 कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. सुशांतच्या वडिलांनी देखील दाखल केलेल्या FIR मध्ये आपल्या मुलाच्या बँक अकाउंटमधून पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला होता. यामुळे आता बिहार पोलिस याचाीह शोध घेत आहेत.सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी वडील CBI चौकशीची मागणी करु शकतात पण बिहार पोलीस तपास करण्यास सक्षम

अलीकडेच इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (Enforcement Directorate) ने रिया आणि तिच्या कुटूंबाविरोधात तक्रार दाखल केली होती. असे सांगण्यात येत होते की, रियाने सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटी रुपयांची हेराफेरी केली होती. मात्र याबाबत कोणतेही पुरावे अद्याप हाती लागलेले नाहीत.

दरम्यान सुशांतच्या वडिलांना या प्रकरणी सीबीआय तपासणी करावीशी वाटत असल्यात ते त्यासाठी मागणी करु शकतात. आम्ही सीबीआयच्या चौकशीची मागणी केलेली नाही. कारण बिहार पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यास सक्षम असल्याचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.