Akshay Kumar | (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) पश्चिम बंगालमध्ये होणा-या भाजपच्या रॅलीमध्ये (BJP Rally) सहभागी होणार आहे अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळत होती. आपल्या कामामध्ये व्यस्त असलेला अक्षय कुमार रॅलीत सहभागी होणार याबाबत त्याचे चाहतेही आश्चर्य व्यक्त करत होते. अक्षय रॅलीत सहभागी होणार असल्याची अफवा अगदी वा-यासारखी सर्वत्र पसरली आणि राजकीय वर्तुळासह त्याच्या चाहत्यांमध्येही जोरदार चर्चा रंगू लागल्या. मात्र या सर्वावर स्वत: अक्षय कुमार याने प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्तान टाईम्स सोबत बोलताना अक्षय कुमारने ही बातमी पूर्णपणे अफवा असल्याचे सांगितले आहे.

अक्षयने पोर्टलसोबत बोलताना सांगितले की, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. तो मुंबईत शूटिंग करत होता. त्याचबरोबर अक्षय कुमारने अशा अफवांवर आश्चर्य व्यक्त केले आहे. खरे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामध्ये रॅलीमध्ये संबोधित करणार आहे.हेदेखील वाचा- 83 Release Date: रणवीर सिंहच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; '83' या दिवशी होणार प्रदर्शित

अक्षय कुमार यांच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर, सध्याच्या दिवसांत तो 'रामसेतु' या चित्रपटाचे शूटिंग करण्यास सुरुवात करत आहे. अलीकडेच अक्षयने स्क्रिप्ट रिडिंग सेशनचे अनेक फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो जैकलीन फर्नांडिज आणि नुशरत भरूचासोबत दिसणार आहे.

अक्षय कुमार या चित्रपटाशिवाय अतरंगी रे, बेल बॉटम सारख्या चित्रपटांत देखील दिसणार आहे. त्याचबरोबर तो सूर्यवंशी या चित्रपटात देखील दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंह देखील असणार आहेत.