बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा थ्रिलर सिनेमा 'बेलबॉटम' (Bell Bottom) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच आता हा सिनेमा येत्या 16 सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही प्रदर्शित केला जाणार आहे. याबद्दल सांगताना अक्षय कुमार याने असे म्हटले की, सिनेमागृहानंतर आता सिनेमाची कधी अधिक लोकांपर्यंत पोहचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ वर बेलबॉटल सिनेमा प्रदर्शित करण्याचा हाच उत्तम मार्ग असू शकतो.
सिनेमा 240 हून अधिक देशांमध्ये पोहचण्यासह याची कथा खुप लोकांपर्यंत पोहचणार आहे. सिनेमाचे निर्देशक रंजीत एम. तिवारी यांनी असे म्हटले की, ही बर्याच न सांगलेल्या नायकांची कथा आहे जी मला इतर प्रत्येकाला सांगण्यास पात्र वाटली. हे एक मनोरंजक कथानकाचे परिपूर्ण मिश्रण आहे. अभिनेत्यांनी त्यांचे सर्व काही दिले आहे जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत आकर्षित करेल.(Antim’s Vighnaharta Song: अजय गोगावले च्या दमदार आवाजातील 'विघ्नहर्ता' गाणं रसिकांच्या भेटीला; Salman Khan सोबत वरूण धवन, आयुष शर्मा थिरकले Watch Video)
Tweet:
Your Monday Mission: Watch the trailer and set reminder for Thursday 🕢
Deadline:You have until sunset 🌅
Watch #BellBottomOnPrime this 16th September!@PrimeVideoIN @vashubhagnani @vaaniofficial @humasqureshi @LaraDutta @ranjit_tiwari @jackkybhagnani @honeybhagnani @poojafilms pic.twitter.com/QgK4qFkXEU
— Akshay Kumar (@akshaykumar) September 13, 2021
सिनेमामध्ये वाणी कपूर, हुमा कुरैशी, लारा दत्ता, आदिल हुसैन आणि अनिरुद्ध दवे सुद्धा दिसून येणार आहेत. बेलबॉटम सिनेमाची निर्मिती वाशु भगनानी, जॅकी भगनानी, दीपाशिख देशमुख, मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी यांनी आपले बॅनर पूज एंटरटेनमेंट आणि एम्मे एंटरनटेनमेंट अंतर्गत केले आहे. विजय सुब्रमण्यम, निर्देशक आणि प्रमुख, सामग्री, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ भारत यांनी म्हटले की, सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. याची कथा जगातील सर्व लोकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.