कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण विषाणूला देशातून हद्दपार करण्यासाठी डॉक्टर्स, पोलिस सारखे अनेक कोविड योद्धा रस्त्यावर उतरले आहेत. कोविड विरुद्ध लढण्यासाठी न केवळ डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालत आहे तर पोलिसही रस्त्यावर उतरून रात्रदिवस जनतेसाठी तैनात राहून आपला जीव धोक्यात घालत आहे. यामुळे या महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांना संपूर्ण जनतेला आपला सोशल अकाउंटवरील प्रोफाईल फोटो बदलून महाराष्ट्र पोलिसांचा (Maharashtra Police) लोगो ठेवावा असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) सह अनेक बॉलिवूड कलाकारांना आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे.
महाराष्ट्र पोलीस जनतेची ज्या पद्धतीने सेवा करत आहे त्यांच्या सन्मानार्थ अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपला फोटो बदलून महाराष्ट्र पोलिस लोगो ठेवला आहे. अक्षय आणि सलमानसह माधुरी दीक्षित, जैकलीन फर्नांडिज, सई मांजरेकर आणि कैटरिना कैफ यांनी देखील महाराष्ट्र पोलिसांना सन्मान म्हणून हे पाऊल उचलले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या सर्व सोशल अकाऊंट्सचा बदलला डीपी, महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवत नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे केले आवाहन
मेरे सुझाव पर पुलिस के हौसला अफज़ाई में शामिल हुए उद्योग, खेल & मनोरंजन की दुनिया के सभी मान्यवरों का मैं तह दिल से शुक्रिया अदा कर रहा हूँ। pic.twitter.com/5bzjitAfFa
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 11, 2020
आपल्या आवाहनाला सर्व कलाकारांनी तसेच जनतेने पाठिंबा दिल्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आभार मानले आहेत. अक्षय कुमारने अलीकडेच मुंबई पोलिसांना 2 करोड रुपये मदत म्हणून दिले आहेत. सलमाननेही नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने पैशाची तसेच अन्नधान्याची मदत केली आहे.
लॉकडाऊन दरम्यान हे सर्व कलाकार घरात राहून आपल्या चाहत्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे. तसेच चाहत्यांनाही घरात राहण्याचा सल्ला देत आहे.