Anil Deshmukh and Maharashtra Police Logo (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात सुरु असलेला कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी अनेक कोविड योद्धा आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यात डॉक्टर्स, नर्ससह महाराष्ट्र पोलिसांचाही समावेश आहे. अशा खडतर परिस्थितीतही आपले काम चोख बजावणा-या या पोलिसांच्या सन्मानार्थ गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी महत्वाचे पाऊल उचचले आहे. त्यांनी आपल्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाच्या अकाऊंटवरील डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला आहे. पोलिसांच्या प्रती आदराची भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे.

हा उपक्रम अशा कोविड योद्धांसाठी जे दिवस रात्र एक करून उन्हा-तान्हात रस्त्यावरन नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव देशसेवेस कर्तव्य तत्पर असणारे हे पोलीस एकटे नसून हे अधोरेखित करण्यासाठी गृहमंत्र्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे तुम्हीही या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यामतून जनतेस केले आहे. मुंबई: कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूहल्ला; हल्लेखोरास अटक

सद्य स्थितीत महाराष्ट्रात सद्य स्थितीत 19063 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासांत या आजारामुळे 37 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कोविड-19 मुळे एकूण मृत्यूंची संख्या 731 झाली आहे. यामध्ये एक समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 3470 लोक बरे झाले आहेत.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाशी लढा देणा-या आणि नागरिकांसाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाने याबाबत माहिती दिली आहे. यातील 648 पोलिसांवर सध्या उपचार सुरु असून 61 जण बरे झाले आहेत. तर 5 पोलिसांचा दुर्दैव मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणा-या पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.