Sooryavanshi 30 एप्रिलला सिनेमागृहांमध्ये होणार रिलीज; आज दिग्दर्शक Rohit Shetty च्या बर्थ डे दिवशी अधिकृत घोषणा
Akshay Kumar, Ranveer Singh and Ajay Devgan (Photo Credits: Instagram)

अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंह (Ranveer Singh), अजय देवगण (Ajay Devgan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) अशी मेगास्टार असलेली बॉलिवूडची फिल्म 'सूर्यवंशी'(Sooryavanshi) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. आज सूर्यवंशी चा दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) याच्या बर्थ डे च्या दिवशी धर्मा प्रोडक्शन कडून सूर्यवंशीची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा 30 एप्रिल 2021 दिवशी प्रदर्शित होणार आहे. करण जोहर सह सूर्यवंशीच्या टीमने एक खास व्हिडीओ पोस्ट करत या सिनेमाच्या रिलीज डेटची जाहीर केली आहे. 'Sooryavanshi' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी उशिरा पोहोचलेल्या रणवीर सिंह ची अजय देवगण आणि अक्षय कुमारसह पत्नी दिपिका पादुकोण ने घेतली शाळा, वाचा मजेशीर कमेंट.

दरम्यान मागील वर्षी सूर्यवंशीचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर सिनेमा प्रदर्शित होणं अपेक्षित होते. पण कोविड 19 संकटामुळे या सिनेमाच्या रिलीजमध्ये अडथळे आले. मात्र रसिकांना दिलेल्या प्रॉमिसनुसार योग्य वेळ आली की सिनेमा रिलीज होईल हे आम्ही पाळलं आहे आणि सिनेमा 30 एप्रिल 2021 ला रिलीज होईल असं सांगण्यात आलं आहे. यावेळी चाहत्यांचे आभार देखील मानन्यात आले आहेत.

करण जोहर ट्वीट

कोविड 19 संकटात सिनेमा क्षेत्र आणि चित्रपटगृह चालकांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता चित्रपटगृह चालवणर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणं आवश्यक आहे. आता सूर्यवंशी या बड्या सिनेमापासून त्याची सुरूवात होणार आहे. रसिकांची गर्दी खेचण्यात सिनेमा यशस्वी होतो का? हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. कालच सलमान खान ने देखील त्याचा राधे 13 मे दिवशी रिलीज होईल असं सांगितलं आहे.

सूर्यवंशी हा अ‍ॅक्शनपॅक्ट सिनेमा असून या सिनेमामध्ये अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिन्ही कलाकार पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहेत.