![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/Tanuja-Kajol-784x441-380x214.jpg)
देवगण कुटूंबियांमागील दु:खाची मालिका काही संपायचे नाव घेत नाही. अलीकडे अभिनेता अजय देवगण याचे वडिल वीरु देवगण यांचे कार्डियल अरेस्टमुळे निधन झाले. त्या दु:खातून देवगण कुटूंबिय सावरतो न सावरतो तोच आता अजय देवगणची सासू म्हणजेच काजोलची आई तनुजा ह्यांना ही रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र त्यांना नेमके काय झाले आहे हे अद्याप कळू शकले नाही. मात्र काजोलचा लिलावती हॉस्पिटलबाहेरील फोटो इन्स्टाग्रमावर फोटो पाहून तिच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. आणि त्यांनी ताबडतोब तिला इन्स्टाग्रामद्वारे विचारपूस करायला सुरुवात केली.
27 मे रोजी वीरु देवगण यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत असता कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे दु:खद निधन झाले. वीरु देवगण यांच्या निधनाचा दु:ख इतके मोठे होते की, ते त्यातून सावरतो न सावरतो तोच काजोलची आई तनुजा ह्यांचीही तब्येत बिघडली असून, त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तनुजा यांना नेमकी काय झाले आहे, हे अद्याप समजू शकले नाही.
काजोलचा इन्स्टावरील फोटो पाहून सर्व चाहत्यांनी वेगवेगळे कमेंट्स करुन काजोलकडे विचारपूस केली. तू रुग्णालयात का गेलीस, सगळं ठिक आहे ना असे सर्वजण कमेंट करतायत.