अभिनेत्री Meera Chopra ला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणात आढळले जिवंत  किडे; सोशल मीडियात शेअर केला व्हिडिओ (Watch Video)
Meera Chopra (Photo Credits: Instagram)

काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोसला (Rahul Bose) मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 2 केळ्यांसाठी 442 रूपयांचं बील धाडल्यावरून सोशल मीडीयात चर्चा रंगली होती. आता प्रियंका चोपड़ा हीची चुलत बहीण मीरा चोपड़ाच्या (Meera Chopra) जेवणात जिवंत अळ्या सापडल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा प्रकार अहमदाबाद येथील एका पंचतारांकित  हॉटेलमध्ये घडला आहे. हॉटेलमध्ये मीरा राहत असून तिने जेवण ऑर्डर केल्यानंतर त्यामध्ये जिवंत  किडे आढळ्याचा दावा केला आहे. मीराने इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट देखील केली आहे. हॉटेलने दोन केळांसाठी आकारले 442 रुपये; राहुल बोसच्या 'त्या' व्हिडीओ नंतर कर विभागाकडून 25 हजारांचा दंड

मीराने इस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून घडलेल्या प्रकाराचा राग व्य्क्त करताना अन्न व औषध विभागाला टॅग करून हा सारा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दाखवला आहे. मोठी हॉटेल्स खाद्यपदार्थांची तगडी रक्कम आकारतात मात्र त्याच्या बदल्यात जेवणात कीडे खायला देतात. मागील काही दिवसात तिची प्रकृती बिघडली असल्याचंही तिने म्हटलं आहे. अहमदनगर: पाणीपुरीच्या ठेल्यावरील पाण्यात सापडल्या जिवंत अळ्या

 

Meera Chopra ची पोस्ट

मीरा लवकरच 'आर्टिकल 375' या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. मीराने आपल्या फिल्मी करियरला तामिळ सिनेमांमधून सुरूवात केली आहे. त्यानंतर तिने काही दक्षिण भारतातील सिनेमांमध्ये काम केल्यानंतर बॉलिवूडकडे मोर्चा वळवला. विक्रम भट यांनी मीराला त्यांची हॉरर फिल्म '1920: लंदन' मध्ये संधी दिली. यानंतर तिने सतिश कौशिक सोबत 'गैंग ऑफ घोस्ट्स' करण जोहरच्या 'कलंक' मध्येही काम केले आहे.