Pushpa: समंथाच्या बोल्ड आणि हिट गाण्यानंतर दुसऱ्या पार्ट मध्ये दिशा पटानी दाखवु शकते आपला बोल्ड अंदाज
Disha Patani (Photo Credit - Insta)

समंथा रुथ प्रभूने (Samantha) 'पुष्पा द राइज' या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) हॉट आणि बोल्ड डान्स आयटम साँग दिले. या गाण्यात समंथाच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना आश्चर्य वाटले तसेच खूप आनंद झाला. या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या गाण्यानंतर असे बोलले जात होते की, पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये 'पुष्पा द रुल'मध्ये समंथाचा डान्स दिसणार आहे, पण कदाचित तसे होणार नाही. होय, समंथा व्यतिरिक्त आणखी काही अभिनेत्री आता आपला डान्स दाखवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समंथाऐवजी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) 'पुष्पा द रुल'मध्ये असु शकते.

दिग्दर्शक सुकुमार यांनी पुष्पा 2 मध्ये हा बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आधीच्या भागाच्या प्रदर्शनाच्या वेळी दिशा त्यात आयटम सॉन्ग देणार असल्याचं बोललं जात होतं, पण नंतर दिशाच्या जागी समंथा दिसली आणि आता दुस-या भागात दिशा दिसेल असं वाटतंय.

समंथाने मानले होते चाहत्यांचे आभार

अलीकडेच तिच्या गाण्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादावर समंथा म्हणाली, 'तुम्हा सर्वांकडून मला जे प्रेम मिळत आहे ते मी सांगू शकत नाही. या गाण्याला एवढा उदंड प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. त्याचवेळी, आधी समंथाने सांगितले होते की, आधी तिला हे आयटम साँग करायचे नव्हते, पण नंतर अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांचे मन वळवल्यानंतर तिने हे आयटम साँग करण्यास होकार दिला. गाण्याला इतकं यश मिळाल्यानंतर समांथाने पूर्ण श्रेय अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांना दिलं. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की, समांथाने या 3 मिनिटांच्या गाण्यासाठी 5 कोटी रुपये घेतले होते. (हे देखील वाचा: 'KGF Chapter 2' चे पहिलं गाणं 'तुफान' प्रेक्षकांच्या भेटीला)

समथांचे आगामी चित्रपट

समंथाचे आता 3 चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत ज्यात काथुवाकुला रेंडू काधल, शकुंतलम आणि यशोदा या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शाकुंतलम या चित्रपटातील समंथाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता, ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.