Arbaaz Khan Defamation Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अरबाज खान याचे नाव गोवणाऱ्या अॅड. विभोर आनंद याला अटक
Arbaaz Khan (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि त्याची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) यांच्या आत्महत्येशी अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) याचे नाव जोडणाऱ्या वकील विभोर आनंद (Adv. Vibhor Anand) याला दिल्लीतून (Delhi) अटक करण्यात आली आहे. सुशांत आणि दिशाच्या आत्महत्या प्रकरणात सोशल मीडिया पोस्टद्वारे अभिनेता अरबाज खान याचे गोवणाऱ्या आरोपीवर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून (Mumbai Police Cyber Cell) कारवाई करण्यात आली आहे. त्याला दिल्ली सायबर सेलमधून मुंबईतील गुन्हे शाखेत आणण्यात आले आहे. या प्रकरणात नाव गोवल्याने मागील महिन्यात अरबाज खान याने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती.

अरबाज खान याने या प्रकरणी मुंबईतील सिव्हिल कोर्टात खटला दाखल केला होता. त्यानंतर कोर्टाने अरबाज खान याची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या बदनामी करणारे सोशल मीडिया पोस्ट मागे घेण्याचे आदेश विभोर आनंद, साक्षी भंडारी आणि काही अज्ञात व्यक्तींना दिले होते. दरम्यान, अरबाज खान याला अटक करण्यात आली असून सीबीआय चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असे या बदनामी करणाऱ्या पोस्टमध्ये म्हटले होते. (Mumbai Police Defamation Case: मुंबई पोलीस बदनामी प्रकरणी दोन गुन्हे दाखल, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा संबंध, सोशल मीडिया गैरवापर भोवला)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरु आहे. त्याचबरोबर ड्रग्सच्या एँगलने देखील NCB या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, AIIMS च्या फॉरेन्सिक टीमने सुशांतने आत्महत्या केल्याचे आपल्या अंतिम अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप सीबीआय तपास सुरु आहे.

यापूर्वी अरबाज खान याने अभिनव कश्यप विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 'दबंग' सिनेमाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप याने खान कुटुंबियांनी करिअर उद्धवस्त केल्याचा आरोप केला होता.