Aditya Narayan ने 'हे' ठेवलं मुलीचं नाव; अर्थ जाणून तुम्हीही म्हणाल व्वा!
Aditya Narayan, Shweta Agarwal (PC - Instagram)

बॉलिवूड गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) हिने एका मुलीला जन्म दिला आहे. खुद्द आदित्यने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आता आदित्यने आपल्या मुलीचे खास नाव ठेवले आहे, ज्याची माहिती त्याने चाहत्यांना दिली आहे. यासोबतचं त्यांनी मुलीच्या नावाचा अर्थही सांगितला आहे जो खूपचं खास आहे.

आदित्यचे इंस्टाग्रामवर 'आस्क मी सेशन' ठेवले होते. त्यादरम्यान त्याने आपल्या मुलीचे नाव सांगितले. एका चाहत्याने आदित्यला त्याच्या मुलीचे नाव विचारले, ज्यावर त्याने सांगितले की त्याने पत्नी श्वेतासोबत मुलीचे नाव 'त्विषा नारायण झा' (Tvisha Narayan Jha) ठेवले आहे. त्याचवेळी या नावाचा अर्थ विचारला असता त्याने सांगितलं की, याचा अर्थ प्रकाश आणि सूर्याची किरणे आहे. खरंतर माझ्या वडिलांच्या नावाचा अर्थ उगवता सूर्य. माझ्या नावाचा अर्थ सूर्य आणि माझ्या मुलीच्या नावाचा अर्थ सूर्यकिरण आहे. यासोबतचं मुलीच्या नावात श्वेताचे नावही आहे. (वाचा - Jalsa Trailer: विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या आगामी 'जलसा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित)

आदित्यने अलिकडे स्पष्ट केले आहे की, तो 'बिग बॉस OTT 2' चा भाग नाही. आदित्यने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका चाहत्याने त्याला विचारले की, खूप बातम्या येत आहेत. सध्या तू 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये येत आहेस. हे खरे की खोटे? याला उत्तर देताना तो म्हणाला, 'मी सर्वांना आधीच स्पष्ट करू इच्छितो की मी कधीही 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दिसणार नाही.

Aditya Narayan Story on Instagram

आदित्य नारायणने काही दिवसांपूर्वी 'सारे ग म प' शो सोडण्याचा निर्णय घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. त्याने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने लिहिलं आहे की, 'मला हे सांगताना खूप दुःख होत आहे की, मी 'सारे ग म प' चे होस्टिंग सोडले आहे. या शोने मला माझी वेगळी ओळख दिली आहे. या शोने 18 वर्षांच्या मुलाला एक समजूतदार माणूस बनवले. ज्याला पत्नी आणि एक मुलगी आहे. 15 वर्षे, 9 हंगाम आणि 350 भाग. आम्ही इतकी वर्षे एकत्र काम केले यावर विश्वासच बसत नाही. वेळ कधी निघून गेली ते कळलेचं नाही.