विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या आगामी 'जलसा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'जलसा' हा चित्रपट होळीच्या दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे'ही येतोय. अशा परिस्थितीत 'जलसा'ला कडवी स्पर्धा होणार आहे. या चित्रपटात विद्या बालन सोबत शेफाली शाह, रोहिणी हट्टंगडी, इक्बाल खान, विधात्री बंदी, श्रीकांत मोहन, शफीन पटेल आणि सूर्या काशीभटला यांसारखे दमदार कलाकार काम करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)