Aditya Narayan ने Shweta Agarwal शी लग्न केल्यानंतर मुंबईत खरेदी केला आलिशान 5 बेडरुम फ्लॅट, घरासाठी मोजले 'इतके' कोटी रुपये
Aditya Narayan-Shweta Agarwal’s Wedding (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) याचे नुकतेच त्याची गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत (Shweta Agarwal) लग्न झाले. हा शाही लग्न सोहळा जुहूच्या इस्कॉन मंदिरात (ISKON Temple) झाला. त्यानंतर दुस-या दिवशी या जोडप्याने एका पंचतारांकित हॉटेल मध्ये ग्रँड रिसेप्शन दिले होते. अगदी मोजके आणि दिग्गज लोक या रिसेप्शनला आले होते. त्यानंतर आदित्य नारायण मुंबईत एक शानदार घर खरेदी केल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईच्या अंधेरी भागात आदित्यने 5 BHK घर (5 BHK Flat) खरेदी केले आहे. हे घर त्याचे स्वप्न होते असे त्याने बॉलिवूड हंगामा यांच्याशी बोलताना सांगितले आहे.

आदित्यने अंधेरीत घेतलेल्या या 5BHK घराची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे. या घरात आदित्य आणि श्वेता येत्या 3-4 महिन्यात शिफ्ट होणार असल्याचेही त्याने बॉलिवूड हंगामाशी बोलताना सांगितले.हेदेखील वाचा- Aditya Narayan-Shweta Agarwal Wedding Reception Photos: गोविंदा, भारती सिंह या सेलिब्रेटींची आदित्य-श्वेता च्या रिसेप्शनला हजेरी; पहा फोटोज, व्हिडिओ

"हे घर माझ्या आईवडिलांच्या घरापासून अगदी 3 बिल्डिंग सोडून आहे. ज्यामुळे माझे आई-वडिल माझ्या अगदी जवळ असतील." असे आदित्यने सांगितले. तसेच या घरासाठी आपण गेली कित्येक वर्षे पैसे जमा करत होतो असेही त्याने सांगितले. यात तो पुढे मस्करी मध्ये असेही म्हणाला मी माझ्या पत्नीला 70% क्लोसेट दिले आहेत. कारण तिला जास्त जागेची जरूरत आहे आणि यात ती खूप साधी आहे.

आदित्यच्या कामाविषयी बोलायचे झाले तर आदित्य इंडियन आयडल या रिअॅलिटी शो चे सूत्रसंचालन करत आहे.