Aditya Narayan-Shweta Agarwal Wedding Reception Photos: गोविंदा, भारती सिंह या सेलिब्रेटींची आदित्य-श्वेता च्या रिसेप्शनला हजेरी; पहा फोटोज, व्हिडिओ
Bharti Singh, Govinda at Aditya Narayan and Shweta Agarwal's wedding reception (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण (Aditya Narayan) 1 डिसेंबर रोजी गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) सोबत लग्नगाठ बांधली. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जुहू येथील इस्कॉन मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आदित्य-श्वेताच्या लग्नसोहळा, विधीचे फोटोज, व्हिडिओज व्हायरल होत आहेत. आता सोशल मीडियावर रिसेप्शनच्या फोटोजनी एन्ट्री मारली आहे. 2 डिसेंबर रोजी संध्याकाळी आदित्य आणि श्वेताचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. या रिसेप्शन पार्टीला गोविंदा (Govinda) सहकुटुंब उपस्थित होता. तर भारती सिंह (Bharti Singh) आणि पती हर्ष लम्बचिया (Haarsh Limbachiyaa) यांनी देखील हजेरी लावली होती. रिसेप्शन पार्टीत सर्वांनी धम्माल, मस्ती केली. याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आदित्यने ब्लॅक कलरचा सूट परिधान केला असून श्वेताने लाल रंगाचा गाऊन घातला होता. यात दोघेही अगदी कमाल दिसत होते. या पार्टीत आदित्य-श्वेता रोमांटिक डान्सही केला. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Aditya Narayan-Shweta Agarwal’s Wedding Photos: आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांच्या विवाहसोहळ्यातील खास फोटोज!)

पहा फोटोज आणि व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Meghdeep Bose (@meghdeep_bose)

 

View this post on Instagram

 

A post shared by @entertainment_set

Bharti Singh, Govinda at Aditya Narayan and Shweta Agarwal's wedding reception (Photo Credits: Instagram)

यापूर्वी तिलक समारंभ, बारात, विवाहसोहळा यांचे फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. आता रिसेप्शनच्या फोटोजची धूम चाहते अनुभवत आहेत. विवाहसोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला असला तरी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले होते.