Adity Ananya PC TWITTER

Aditya Ananya Breakup: बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेता अनन्या पांडे यांचं रिलेशनशिप नेहमी चर्चेत असते. परंतु या दोघांचे ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना थोडा धक्काच बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार,दोघांनी मार्च महिन्यांत ब्रेकअप केलं होते. ब्रेकअप संदर्भातील ही माहिती दोघांच्या जवळच्या मित्राने एका इंग्रजी वृत्तपत्रात दिली होती. (हेही वाचा- आरोग्याची एवढी काळजी घेऊन ही)

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्या रॉय कपूर आणि अनन्या पांडे हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. एका महिन्यापूर्वीं  त्यांनी ब्रेकअप केलं. जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये दोघे ही सहभागी झाले होते. अनन्याने गेल्या महिन्यात एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. ब्रेकअप संदर्भात हा पोस्ट चर्चेत होता. त्यावेळी दोघांन्ही अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नव्हती.  (हेही वाचा- इक्वेडोरच्या ब्युटी क्वीनची गोळ्या झाडून हत्या; इंस्टाग्राम पोस्टमुळे उघड झाले मारेकऱ्यांचे ठिकाण)

दोघांच्या जवळच्या एका मित्राने ब्रेकअप संदर्भात मीडियाला माहिती दिली. त्याने सांगितले की, दोघे जण खुप चांगले एकमेकांशी वागत होते परंतु काही काळानंतर दोघांमध्ये भांडण सुरु झालं. ब्रेकअप नंतर अनन्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. ती तिच्या नवीन मित्रांसोबत वेळ घालवत आहे.  ब्रेकअपमुळे आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. आदित्यही परिस्थितीला समोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे.