Adipurush चित्रपटामध्ये होणार पात्रांच्या लूकवर काम; VFX द्वारे सैफ अली खानची दाढी काढली जाणार, टीकेनंतर निर्मात्यांचा निर्णय- Reports
Adipurush (Photo Credit - Twitter)

दक्षिणात्य अभिनेता प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटामध्ये व्यस्थ आहे. हा चित्रपट रामायणवर आधारीत असून, प्रभास यामध्ये भगवान रामाची भूमिका सकारात आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये आदिपुरुष चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. परंतु या चित्रपटामध्ये रामायणामधील पात्रांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण केले असल्याचा आरोप झाला. अनेक राजकीय नेत्यांनीही टीजरमधील पात्रांवर आक्षेप घेतला होता. आता बातमी आहे की, मेकर्स नव्याने पात्रांच्या लूकवर काम करणार आहे. विशेषतः रावणाच्या लूकमध्ये बरेच बदल केले जातील.

मोठ्या अपेक्षाने आणि उत्साहाने मेकर्सनी आदिपुरुषचा टीजर प्रदर्शित केला. परंतु अल्पावधीतच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. चित्रपटावर होत असलेली टीका पाहता, निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट 16 जून 2023 पर्यंत वाढवली. आता पात्रांचा लूकही बदलणार असल्याचे अहवाल समोर येत आहेत. या चित्रपटात सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. सर्वात जास्त वाद त्याच्या लूकबद्दल आहे.

सैफला टीझरमध्ये पाहिल्यानंतर लोकांनी सांगितले की, तो रावणऐवजी खिलजी दिसत आहे. काही लोकांनी तैमूर, औरंगजेब यांसारख्या इस्लामिक आक्रमकांसारखे त्याचे रूप दिसत असल्याचे सांगितले. रिपोर्टनुसार, चित्रपट निर्मात्यांनी सैफचा लुक बदलण्याचा निर्णय घेतला. VFX च्या मदतीने त्याची दाढी काढली जाईल, असे अहवालात म्हटले आहे. या बदलांसाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च केले जातील असा अंदाज आहे. परंतु याबाबत अधिकृतपणे काहीही माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, टीझर रिलीज झाल्यानंतर जेव्हा रावणाच्या लूकवरून वाद झाला तेव्हा मनोज मुंतशीरने चित्रपटाच्या बचावासाठी पुढे आला. आदिपुरुषचा संवाद लेखक आणि गीतकार मनोज म्हणाला होता, ‘प्रत्येक युगाच्या वाईटाचा स्वतःचा चेहरा असतो. अलाउद्दीन खिलजी हा या काळातील वाईटाचा चेहरा आहे. आपण जाणूनबुजून असा 'आदिपुरुष' रावण बनवला नाही. पण जरी तो खिलजीसारखा दिसत असला तरी त्याच्यात काहीही चूक नाही.’ (हेही वाचा: आपल्या अभिनय कारकिर्दीबाबत Aamir Khan ने घेतला मोठा निर्णय; चाहत्यांना धक्का)

प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर 'आदिपुरुष' चा 1.46 मिनिटांचा टीझर 2 ऑक्टोबर 2022 रोजी अयोध्येत रिलीज झाला होता. राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी 5 ऑक्टोबर 2022 रोजी सांगितले की, भगवान राम, हनुमान आणि रावण यांचे चित्रपटामधील  चित्रण महाकाव्यानुसार नाही. हा चित्रपट त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. चित्रपट बनवणे हा गुन्हा नाही, पण प्रसिद्धीसाठी मुद्दाम वाद निर्माण करू नयेत.