काही काळापूर्वी बातमी आली होती की, आमिर खान (Aamir Khan) 'चॅम्पियन्स' या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवत आहे, ज्यामध्ये तो अभिनयही करणार आहे. मात्र आत आमिरने या प्रोजेक्टमधून हात मागे घेतला आहे. 'चॅम्पियन्स'च्या रिमेकमध्ये तो अभिनय करणार नसल्याचे खुद्द आमिरने स्पष्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे, आता आपण पुढील काही वर्षे अभिनय करणार नसल्याचे आमिर खानने म्हटले आहे. आमिरला विश्रांती घ्यायची आहे, त्याला कुटुंब आणि मुलांसोबत वेळ घालवायचा आहे.
आमिर खान काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाद्वारे आमिर चार वर्षांनी अभिनेता म्हणून पडद्यावर परतला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. ट्रेलर रिलीज झाल्यापासून 'लाल सिंह चड्ढा'वर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली. अखेर जे व्हायचे तेच झाले, लालसिंग चड्ढा पूर्णपणे आपटला.
हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर काही दिवसांनी आमिरने 2008 साली आलेल्या चॅम्पियन्स या स्पॅनिश चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे हक्क विकत घेतल्याची बातमी आली. 'लाल सिंग चढ्ढा' हा हॉलिवूडपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक होता. 'लाल सिंह चढ्ढा'नंतर आमिर खान 'चॅम्पियन्स'मध्ये काम करणार होता. पण आता त्याने आपला विचार बदलला आहे. आमिर खान एका कार्यक्रमात 'चॅम्पियन्स'बद्दल मोठी माहिती शेअर केली. त्याने सांगितले की, तो या चित्रपटामध्ये अभिनय करणार नाही मात्र या चित्रपटाची निर्मिती नक्कीच करेल.
#AamirKhan will produce #Champions.
Aamir shared “It's a wonderful script, it's a beautiful story, and it’s a very heartwarming and lovely film but I feel I want to take a break. I want to be with my family, I want to be with my mom and my kids." pic.twitter.com/GMFU78Jmtj
— Ashwani kumar (@BorntobeAshwani) November 14, 2022
आमिर खान म्हणाला, 'मी जेव्हा एखादा प्रकल्प घेतो तेव्हा मी चित्रपटात इतका हरवून जातो की माझ्या आयुष्यात दुसरे काहीच घडत नाही. 'लाल सिंग चड्ढा' नंतर मला 'चॅम्पियन्स'चा रिमेक करायचा होता. ही एक अप्रतिम स्क्रिप्ट आहे. ही एक सुंदर कथा आहे. पण मला वाटते मला ब्रेक घ्यायचा आहे. मला माझ्या कुटुंबासोबत राहायचे आहे. मला माझी आई आणि माझ्या मुलांसोबत वेळ घालवायचा आहे.’
तो पुढे म्हणाला, ‘मला वाटते की मी 35 वर्षांपासून काम करत आहे. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. मला वाटते की माझ्या जवळच्या लोकांसाठी ते योग्य नाही. हे माझ्यासाठी अनेक प्रकारे न्याय्य नाही. आयुष्य वेगळ्या पद्धतीने अनुभवण्यासाठी हा वेळ वापरण्याची माझी योजना आहे.’ त्याने सांगितले की, तो 'चॅम्पियन्स'ची निर्मिती करणार आहे आणि या चित्रपटासाठी इतर कलाकारांशी संपर्क साधेन. (हेही वाचा: Shah Rukh Khan वर कस्टम अधिकाऱ्यांची कारवाई; महागडी घड्याळे बाळगल्याप्रकरणी ठोठावला 6.83 लाखांचा दंड)
दरम्यान, आमिर खानपूर्वी शाहरुख खानने 2018 मध्ये 'झिरो' फ्लॉप झाल्यानंतर अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता शाहरुख 4 वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात परतत आहे. 2022 मध्ये, शाहरुख खान 'लाल सिंग चड्ढा', 'ब्रह्मास्त्र' आणि 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' अशा चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिकेत दिसला होता. लवकरच तो 'पठाण', 'टायगर 3', 'डँकी' आणि 'जवान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.