Shilpa Shetty (Photo Credits: YouTube)

रमजान ईद (Ramzan Eid) सणानिमित्त मुस्लिम बाधंवांमध्ये एका वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. या दिवशी मुस्लिमांच्या घरात शीर कुर्मा, बिर्याणी यांसारखे पंचपक्वाने बनविली जातात. यासोबत एक हटके रेसिपी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने आपल्या युट्यूब चॅनेल 'The Shilpa Shetty Kundra' मधून दाखविली आहे. या रेसिपीचे नाव आहे 'तांदळाची फिरनी'. शिल्पाने अनोख्या अंदाजात मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन ही रेसिपी दाखविली आहे.

शिल्पा आपल्या चॅनेलवर सर्व पौष्टिक रेसिपीज दाखवत असल्यामुळे या रेसिपीमध्येही तिने साखरेच्या जागी एक वेगळाच पदार्थ वापरला आहे. Gudi Padwa 2020 Puran Poli Recipe: 'गुढी पाडवा' निमित्त अभिनेत्री शिल्पा शेट्टी ने बनवली खास पुरण पोळी; तुम्हीही नक्की ट्राय करा, पहा व्हिडिओ

पाहा व्हिडिओ:

याआधीही शिल्पाने महाराष्ट्रीय लोकांच्या 'गुढीपाडवा' सणानिमित्त पौष्टिक पुरणपोळीची रेसिपी दाखवली होती. शिल्पा शेट्टी च्या या युट्यूब चॅनेलचे 1.5 मिलियन सब्सक्रायबर आहेत.

बॉलिवूडची ही हॉट अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) सध्या सोशल मिडियावरही प्रचंड धुमाकूळ घालतेय. याआधी तिने आपले योगाचे व्हिडिओ शेअर करून आपल्या चाहत्यांचे मन जिंकले होतेच मात्र आता तिच्या टिकटॉक व्हिडिओ ने ती अनेकांना वेडं लावत आहे. नुकतेच तिचे टिकटॉकर 15 मिलियन फॉलोअर्स झाले. लॉकडाऊनच्या काळात आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी एकाहून एक गमतीशीर, मजेशीर व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करत आहे.