अभिनेत्री शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra) हिला जुहू (Juhu) येथील कूपर हॉस्पिटलमध्ये (Cooper Hospital) दाखल करण्यात आले आहे. स्ट्रोकमुळे तिच्या शरीराच्या उजव्या बाजूवर मोठा परिणाम झाला आहे. कोविड-19 (Covid-19) संसर्गातून बरी झाल्यानंतर महिन्याभरातच अभिनेत्रीला स्ट्रोक चा त्रास झाला. तिच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना शिखाची पीआर मॅनेजर अश्विनी शुक्ला (PR Manager Ashwani Shukla) यांनी आयएएनएसला (IANS) सांगितले की, "शिखाला मेजर स्ट्रोकचा सामना करावा लागला. त्यामुळे तिच्या उजव्या बाजूवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. तिला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे." (International Nurse Day 2020: मुंबई महापौर किशोरी पेडणेकर ते बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा कोरोना संकटात 'या' महिलांनी पुन्हा स्वीकारला रूग्णसेवेचा वसा!)
"10 डिसेंबर रोजी रात्री उशिरा शिखाला पॅरालिसिसचा (Paralysis) झटका आला. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिला सध्या बोलता येत नाहीये आणि सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत," असे तिच्या मॅनेजरने सांगितले. शिखाने नर्सचे प्रशिक्षण घेतले असून गेल्या 6 महिन्यांपासून ती स्वयंसेवक म्हणून कोविड रुग्णांची सेवा करत आहे. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांशी संपर्क आल्याने तिलाही ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती.
पहा पोस्ट:
View this post on Instagram
शिखा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याने ती चाहत्यांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असते. कोरोनाची लागण झाल्यानंतर हेल्थ अपडेट्स देखील तिने शेअर केले होते. दरम्यान, शिखा शाहरुख खान याच्या 'फॅन' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.