Rakesh-Shamita Breakup: अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचा  ब्रेकअप झाला? अफवेवर जोडप्याने दिली 'ही' प्रतिक्रिया
Shamita Shetty, Rakesh Bapat (PC - Instagram)

Rakesh-Shamita Breakup: गेल्या काही वर्षांत रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या घरात अनेक प्रेमकथा घडल्या आहेत. 'बिग बॉस'च्या घरात अनेक सेलिब्रिटी प्रेमात पडलेले दिसले. यातील काही लोक दीर्घकाळ एकत्र राहतात, तर काही घर सोडल्यानंतर वेगळे होतात. अलीकडेचं 'बिग बॉस 15'मध्ये दिसलेले राकेश बापट (Rakesh Bapat) आणि शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आहे. यावर आता दोघांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपची बातमी नुकतीच समोर आली. राकेशच्या जवळच्या एका सूत्राने पिंकविलाला सांगितले की, "त्यांच्यामध्ये गोष्टी बरोबर नाहीत. ते अनेक गोष्टींवरून भांडत होते आणि त्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला." मात्र, यादरम्यान शमिता शेट्टी मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान तिने राकेशसोबतच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली. त्यांने सांगितले की, ते वेगळे झालेले नाहीत. (वाचा - Aditya Narayan ने 'हे' ठेवलं मुलीचं नाव; अर्थ जाणून तुम्हीही म्हणाल व्वा!)

एवढेचं नाही तर राकेश बापट यांनी 'ब्रेकअप'वरील लेखाचा स्क्रीनशॉट त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करत ही निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आम्ही तुम्हाला विनंती करतो की, आमच्या नात्याशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. यामध्ये कोणतेही तथ्य नाही."

 

View this post on Instagram

 

A post shared by Fifafooz (@fifafoozofficial)

राकेश आणि शमिताचे अफेअर 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सुरू झाले होते. ते नेहमी घरात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसायचे. सध्या तरी राकेशच्या वक्तव्यावरून शमितासोबत ब्रेकअप झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.