अभिनेत्री सारा अली खान ही आपला भाऊ इब्राहिम ला करायला लावते 'हे' काम, फोटो पाहून तुम्हाला हसू होईल अनावर
Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

सध्या सोशल मिडियाचे फॅड एवढे वाढत चालले आहे की लोकांना आपल्या प्रत्येक सोनेरी क्षणांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करायचे असतात. विशेष करुन सणांना हा उत्साह जरा जास्तच वाढतो. आपले प्रत्येक ड्रेसमध्ये, लूकमध्ये आपले फोटो यावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्नात असतो यात विशेष करून मुलींना आणि तमाम महिला वर्गाला फोटो काढण्याची हौस असते. मग ते फोटो काढण्यासाठी ते आपल्या घरातील किंवा मित्रपरिवारातील लोकांना आपले फोटो काढण्यासाठी गि-हाईक बनवतात. बहिणींसाठी विशेष करुन आपले भाऊ या कामासाठी टार्गेट असतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढायला सांगून या बहिणी आपल्या भावांच्या नाकी नऊ आणतात. मग यात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) देखील कशी मागे राहिल.

सध्या ती आपल्या कुटूंबासोबत दिवाळी साजरी करत आहे. यात नुकतेच तिने सैफ अली खान (Saif Ali Khan), करिना कपूर (Kareena Kapoor), तैमूर (Taimur), भाऊ इब्राहिम (Ibrahim Ali Khan) यांच्या सोबत दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले.

 

View this post on Instagram

 

दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ 🙏🏻🎉🕯🎊💫💥🌈🍭🧿💙

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

यात तिचा एक सिंगल फोटो आहे. हा फोटो काढणारा व्यक्ती तुम्ही पाहिला तर तुम्हाला हसू आवरणार नाही.

Sara Ali Khan (Photo Credits: Instagram)

हेदेखील वाचा- Bhaubeej 2019: भाऊबीजे निमित्त ओवाळणीत चुकूनही देऊ नका ह्या '3' गोष्टी ज्या मानल्या जातात अशुभ

तिचा सख्खा भाऊ इब्राहिम हा तिचा फोटो काढत आहे हे तुम्हाला तिच्या मागे असलेल्या आरशात दिसत आहे. थोडक्यात स्वत:चा फोटो काढण्यासाठी या बॉलिवूड अभिनेत्री आपल्या भावांना देखील सोडत नाही हे यावरुन दिसतय.

या फोटोत इब्राहिमही तितक्याच आवडीने आपली बहिण साराचा फोटो काढताना दिसत आहे. सारा आणि इब्राहिमचे एकमेकांसोबत खूप छान बाँडिंग आहे. तसेच साराचे आपला सावत्र भाऊ तैमूर सोबत ही खूप छान जमते. या फोटोला अनेक जणांनी लाइक केले आहे.