भाऊ बहिणीचे नातं हे इतकं पवित्र आणि निरागस नातं आहे ज्यात प्रेम, माया, भांडण, राग-रुसवा ह्या सर्व गोष्टी येतात. हे नातं शब्दांत कधीच व्यक्त होत नाही. कारण हे नाते शब्दांच्या पलीकडचे असते. अशा या नात्याला अजून घट्ट करण्यासाठी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या सणानिमित्त बहिणी आपल्या भावाचे कर्तृत्व, दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्यासाठी यमाकडे प्रार्थना करतात. या दिवशी बहिणी भावाला औक्षण करून त्याच्या भाळी गंधाचा टिळा लावतात. त्यानंतर देवाजवळ त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. यावेळी बहिणीसोबत भावालाही ओवाळणी दिली जाते.
रक्षाबंधन असो वा भाऊबीज बहिणीला दोन्ही सणाला ओवाळणी मिळतेच किंबहुना बहिणी घेतातच. मात्र भावाला भाऊबीजेदिवशी ओवाळणी मिळते. या ओवाळणीत भावाला किंवा बहिणीला जी भेटवस्तू दिली जाते, त्यात चुकूनही पुढे दिलेल्या गोष्टींचा समावेश नसावा असा सल्ला विवेक वैद्य गुरुजी यांनी लेटेस्टली मराठीशी बोलताना सांगितला आहे. या गोष्टी या सणादिवशी अशुभ मानल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी:
1. भाऊबीजेला ओवाळणीत काळ्या रंगाचे वस्तू विशेषत: कपडे भेटवस्तू म्हणून देऊ नये.
2. तसेच ओवाळणीच्या शुभमुहूर्ता दरम्यान किंबहुना संपूर्ण दिवस भावाला किंवा बहिणीला टोमणे अथवा अपशब्द वापरू नये. तसेच इतरांविषयी वाईट बोलू नये.
हेदेखील वाचा- Bhaubeej 2019: भाऊबीजेला 'या' वेळेत करा बंधुरायाची ओवाळणी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी
3. भेटवस्तू म्हणून देवघरात ठेवण्यासाठी देवाची मूर्ती अथवा फोटो देऊ नये.
भाऊबीज हा सण स्नेहाचा, आपुलकीचा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक भावंडांमध्ये प्रेम असते मात्र ते कधीही एकमेकांसमोर व्यक्त केले जात नाही. असे हे अव्यक्त प्रेम दिसते बहिणीच्या पाठवणीवेळी. त्यामुळे हे भावा-बहिणींमधील हे अव्यक्त प्रेम असेच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना