Kajal Aggarwal Wedding Photos: दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गौतम किचलू च्या लग्नाचे फोटो व्हायरल; पहा
Kajal Aggarwal Wedding Photos (Photo Credits: Instagram)

Kajal Aggarwal Wedding Photos: दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ने 30 ऑक्टोबर रोजी प्रियकर गौतम किचलू (Gautam Kitchlu) सोबत लग्न केले. या दोघांनी मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये धूमधडाक्यात लग्न केले. मात्र, कोरोनामुळे काजलच्या लग्नात मोजकेचं लोक उपस्थित होते. या लग्नात दोन्ही कुटुंबातील अगदी जवळचे लोक उपस्थित होते. सध्या काजलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघांची जोडी अतिशय क्यूट दिसत आहे. काजलने लग्नासाठी गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर गौतमने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. काजल गुलाबी रंगाच्या लेहग्यांमध्ये खूपचं सुंदर दिसत आहे. या फोटोत ती गौतमबरोबर सप्तपदी चालताना दिसत आहे.

दरम्यान, काजल आणि गौतमचे हे फोटो वरमाळा घालतानाचे आहेत. यावेळी काजलचे दागिनेही पाहण्यासारखे आहेत. काजलने कपाळावर पट्टी, कमरबंद आणि गळ्यात सुंदर दागिने घातले आहेत. दोघांची जोडी अतिशय सुंदर वाटत आहे. काजलच्या चाहत्यांनी या फोटोंना लाईक तसेच कमेन्ट्स दिल्या आहेत. (हेही वाचा -'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिका अल्पावधीतच वादाच्या भोवऱ्यात; कथानकावर आक्षेप घेत पुजारी, ग्रामस्थांची मालिका बंद करण्याची मागणी)

काजल आणि गौतमच्या लग्नाचे फोटो -

 

View this post on Instagram

 

Exclusive 💃🏻🙈🥳 @kajalaggarwalofficial #kajalaggarwal #kajgautkitched

A post shared by KajPriya💫 (@kajpriya) on

 

View this post on Instagram

 

🥺🥺❤️❤️ Just Married @kajalaggarwalofficial @kitchlug #kajalaggarwal #kajgautkitched

A post shared by KajPriya💫 (@kajpriya) on

 

View this post on Instagram

 

Calm before the storm 🔥@kajalaggarwalofficial 🔥 #kajgautkitched #kajalaggarwal

A post shared by KajPriya💫 (@kajpriya) on

काजलच्या संगीत, मेहंदी आणि प्री वेडिंग फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांनी लाईक तसेच कमेन्ट्सही दिल्या. याशिवाय काजलच्या चाहत्यांनी तिला आणि गौतमला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

❣️❤️🥺💃🏻 @kajalaggarwalofficial #kajalaggarwal #kajgautkitched

A post shared by KajPriya💫 (@kajpriya) on

 

View this post on Instagram

 

🥺❣️ @kajalaggarwalofficial #kajgautkitched #kajalaggarwal

A post shared by KajPriya💫 (@kajpriya) on

यापूर्वी काजच्या लग्नाच्या मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात काजलचा लूक पाहण्यासारखा आहे. काजलचा पती एक प्रसिद्ध व्यावसायिक आहे. ते डेसरन लिव्हिंग डिझाईन शॉपचे संस्थापक आणि इंटिरियर डिझायनर आहेत.