अभिनेता सलमान खान मागील 3 महिन्यांपासून कोरोना संकटकाळामध्ये पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. तेथेच ग्रामीण जीवनाचा अनुभव घेत असताना आता तो शेतीमध्ये काम करतानादेखील दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शेतामध्ये 'दाने दाने पे लिखा है, खाने वाले का नाम' जय जवान जय किसान ... अशा मेसेज सह एक फोटो ट्विट केला होता. त्यापाठोपाठ आज (14 जुलै) सलमान खानने चिखलात माखलेला अजून एक फोटो पोस्ट करत शेतकर्यांबददल आदर... असा लिहीत फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे बॉलिवूडचा हा दबंगस्टार आता लॉकडाऊनच्या काळामध्ये मात्र आपला वेळ शेतीच्या कामांमध्ये घालावताना दिसत आहे.
सलमान खान प्रमाणेच काही दिवसांपूर्वी अभिनेता नवाझुद्दीन सिद्धीकी देखील शेतामध्ये काम करताना दिसला होता. तर अभिनेत्री जुही चावला, शिल्पा शेट्टी, ट्विंकल खन्ना यांनी बाल्कनीमध्ये आपलं होम गार्डन करत काही भाज्यांची लागवड केली होती.
सलमान खानचा फोटो
लॉकडाऊनच्या काळात सलमान खान पनवेलमध्ये त्याच्या काही सहकार्यांसोबत राहत आहे. यामध्ये सुरवातीला काही गाण्यांची शूटिंग करून त्याने आपल्या युट्युब चॅनलवर टाकली होती. त्यानंतर आता पावसाळ्याच्या दिवसात सलमान शेतीची कामं करताना दिसत आहे.
सलामान खानचे व्यावासायिक प्रोजेक्ट्स पाहता तो आता बिग बॉसचा होस्ट म्हणून पुन्हा दिसणार आहे. तर राधे हा त्याचा आगामी सिनेमा आहे. यामध्ये अभिनेत्री दिशा पटानी त्याच्यासोबत असेल. मात्र सध्या कोरोना व्हायरस संकटामुळे हा सिनेमा लांबणीवर पडला आहे.