Ranbir Kapoor (Photo credit: Facebook)

बॉलिवूड मध्ये तरूणाईच्या गळ्यातला ताईत असलेला अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान सकाळपासूनच रणबीरच्या प्रकृतीबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. त्याचे काका रणधीर कपूर यांनी देखील रणबीरची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं होतं. मात्र त्याच्या आरोग्याबाबत अपडेट्स दिले नव्हते. पण रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू सिंग कपूर  (Neetu Kapoor) यांनी रणबीरला कोविड 19 ची लागण झाल्याचं म्हटलं आहे. दरम्यान नीतू सिंग यांनी रणबीरची प्रकृती ठीक आहे आणि तो रिकव्हर होत असल्याचं देखील म्हटलं आहे.

नीतू सिंग यांना देखील काही महिन्यांपूर्वी 'जुग जुग जियो' च्या सेट्सवर कोविडची लागण झाली होती मात्र त्या या आजारावर मात करून आता ठीक झाल्या आहेत.

ANI Tweet

नीतू कपूर यांची पोस्ट 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

रणबीर कपूरला कोरोनाची लागण झालेली असली तरीही तो सध्याच घरीच आहे. घरामध्येच रणबीर वर औषधोपचार सुरू असून तो सारे प्रोटोकॉल सांभाळत असल्याचं नीतू कपूर यांनी सांगितलं आहे. सोबतच त्यांनी रणबीरच्या प्रकृतीची काळजी करणार्‍या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

आगामी काही दिवसांत रणबीर कपूर 'ब्रम्हास्त्र' सिनेमामध्ये झळकणार आहे. सोबतच लव रंजन यांच्या अनटायटल्ड सिनेमा मध्येही त्याचा समावेश आहे. या सिनेमामध्ये रणबीर अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबत स्क्रिन शेअर करेल. तर परिणिती चोपडा सोबत 'एनिमल' सिनेमामध्येही तो झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन संदीप वांगा रेड्डी करणार आहेत.