Bole Chudiyan सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार रोमँटिक फॅमिली मॅन; ट्विटर वरून शेअर केली खास झलक  (Watch Video)
Bole Chudiyan Teaser (Photo Credits: Twitter)

सेक्रेड गेम्स (Sacred Games) असो गँग्स ऑफ वासेपूर (Gangs Of Wasseypur) बहुतांश वेळेस गुंड किंवा गँगस्टर च्या रूपात दिसून येणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीचे (Nawazuddin Siddiqui)  एक वेगळे रूप येत्या काही दिवसात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. बोले चुडियाँ (Bole Chudiyan) या आगामी सिनेमातून नवाज पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर रोमॅंटिक हिरो साकारणार आहे. अतिशय संवेदनशील भूमिका लीलया साकारणाऱ्या नवाझला एका नव्या ढंगात पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. सेक्रेड गेम्स च्या सेकेंड सीझनच्या वेळेस बोले चुडियाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता.या सिनेमात नवाजसोबत टीव्ही स्टार मौनी रॉय (Mouni Roy) ,तमन्ना भाटिया (Tamnnah Bhatia) सुद्धा दिसून येणार आहे. ट्रेलर मध्ये सांगितल्यानुसार हा सिनेमा नवाजच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्स्यांवर आधारित असणार आहे.

नवाझने बोले चुडिया सिनेमाचे ट्रेलर प्रदर्शित करताना त्यासोबत आपल्या हटके शैलीत कॅप्शन दिले होते, " 'अब अपुनको लाईफमे कोई लफडा नही चाहिये. बस रोमान्स और फॅमिली...' असे म्हणत हा 29 सेकेंदाचा टीझर लाँच करण्यात आला होता. 'हाऊसफुल 4' मधील एका गाण्यामध्ये थिरकताना दिसणार नवाजुद्दीन सिद्दीकी

बोले चुडिया टीझर

दरम्यान  या चित्रपटात नवाझने अनोखी भूमिका साकारणे हे सोडूनही अनेकखास गोष्टी असणार आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने नवाझ एक खास रॅप गाणार असल्याचे समजत आहे. याबाबद्दल देखील त्याने स्वतः माहिती देत 'मी गायक नाही, पण मी उत्तम रॅप गाण्याचा प्रयत्न जरूर केला आहे'. निर्मात्यांच्या आग्रहामुळे मी रॅप गायले आहे, माझ्यात उत्तम गाणं गाण्याची क्षमता आहे किंवा मला गायक बनायचे आहे असे अजिबात नाही. पण त्या गाण्यात अशा काही गोष्टी आहेत ज्यासोबत माझा आवाज जुळला, असे सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवाझचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी करणार आहे.