सूरमा भोपाली ही व्यक्तिरेखा साकरणारे जेष्ठ अभिनेते जगदीप साहब (Jagdeep Sahab Passed Away) उर्फ सैयद इश्तियाक जाफरी यांचे बुधवारची वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. जगदीप साहेब यांच्यावर आज अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी आता बाॅलिवूड अभिनेता जावेद जाफरी आपण त्याची पत्नी पोहचले आहेत. तर जगदीप साहब यांच्या निधनानंतर बाॅलिवूड कलाकार अजय देवगन, अनुभव सिन्हा, सुनील पाल यांच्यासह अन्य कलाकारांनी सोशल मीडियात दु:ख व्यक्त केले आहे.
जगदीप साहब यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून अफसाना या चित्रपटातून केली होती. जगदीप यांनी अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात काम केले असून आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत. तसेच जगदीप साहब यांची शोले चित्रपटातील सुरमा भोपाली नावाच्या भुमिकेने सर्वांच्या मनावर छाप सोडली होती.(Veteran Actor Jagdeep Sahab Passed Away: शोले चित्रपटात 'सूरमा भोपाली' व्यक्तिरेखा साकरणारे जेष्ठ अभिनेते जगदीप साहब यांचे निधन)
Jagdeep Sahab Passed Away: शोले चित्रपटात 'सूरमा भोपाली' व्यक्तिरेखा साकरणारे जगदीप यांचे निधन - Watch Video
जगदीप यांनी त्यांच्या करियरमध्ये जवळजवळ 300 चित्रपटात काम केले आहे. शोले, मच्छी इन पुराना मंदिर, अंदाज अपना-अपना (1994), फिर वही रात, कुरबानी, शहेनशाह सारख्या चित्रपटांतून ते झळकले होते. जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 साली मध्य प्रदेश मध्ये झाला होता. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती.अफसाना चित्रपटात बालभूमिका साकारत सिनेसृष्टीत पाऊल टाकले होते. त्यांनी 'दो बीघा जमीन' या चित्रपटातून एक कॉमेडियन म्हणून अभिनय केला होता.