शोले चित्रपटात सूरमा भोपाली ही व्यक्तिरेखा साकरणारे जेष्ठ अभिनेते जगदीप साहब (Jagdeep Sahab Passed Away) उर्फ सैयद इश्तियाक जाफरी यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 81 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. जगदीप साहब यांच्या रुपात उत्कृष्ट अभिनेता गमवल्याने सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. जगदीप साहब यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बाल कलाकार म्हणून अफसाना या चित्रपटातून केली होती. जगदीप यांनी अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात काम केले असून आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक चाहत्यांची मन जिंकली आहेत.
जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 साली मध्य प्रदेश मध्ये झाला होता. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांना अनेक चित्रपटात काम केले आहे. परंतु, अंदाज अपना अपना (1994), शोले (1975), आपना देश (1972), आलेल्या या चित्रपटांनी त्यांना नवी ओळख मिळाली आहे. त्यांनी अफसाना चित्रपटात बालभूमिका साकारत सिनेसृष्टीत पाऊल टाकले होते. त्यांनी 'दो बीघा जमीन' या चित्रपटातून एक कॉमेडियन म्हणून अभिनय केला होता. हे देखील वाचा- Kannada Actor Susheel Gowda Passes Away: कन्नड अभिनेता सुशील गौडा याचे निधन; आत्महत्या केल्याचे वृत्त
पीटीआयचे ट्वीट-
Veteran actor Jagdeep dead at 81
— Press Trust of India (@PTI_News) July 8, 2020
एका मुलाखतीत जगदीप यांना विचारले होते की, 'तुम्हाला खर्या नावापेक्षा जगदीप या नावाने ओळखले जाते. तसेच भोपाळची भाषा जगभर प्रसिद्ध व्हावी, असे तुमच्या मनात कसे आली? ' या प्रश्नाच्या उत्तरात जगदीप म्हणाले, 'ही एक लांबलचक आणि रंजक कहाणी आहे. सलीम आणि जावेद यांचा एक चित्रपट होता 'सराहादी लुटेरा', मी या चित्रपटात एक विनोदकार होतो. माझे संवाद खूप मोठे होते, म्हणून मी चित्रपट दिग्दर्शक सलीमकडे गेलो आणि त्यांना सांगितले की हे संवाद खूप मोठे आहेत. तेव्हा त्यांनी मला हे जावेदला बोल असे सांगितले होते. त्यानंतर मी जावेदकडे गेलो आणि जावेदला सांगितल्यावर त्यांनी पटकन संवाद पाच ओळींमध्ये जोडला. त्यावेळी मी त्याच्या लेखनाचे कौतूकही केले होते. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गप्पा मारत असताना जावेदच्या तोंडातून "क्या जाने, किधर कहां- कहां से आ जाते हैं, असे वाक्य बाहेर आले. त्यावेळी ही भोपाळची भाषा असल्याची जगदीप यांना कळाले. तेव्हापासून त्यांना भोपाळी भाषेची आवड निर्माण झाली, असेही जगदीप म्हणाले आहेत.