Anil Kapoor Birthday: ‘जुग जुग जिओ’ चित्रपटाच्या सेटवर साजरा करण्यात आला अभिनेता अनिल कपूर यांचा वाढदिवस; पहा Inside Video
Anil Kapoor Birthday (Image Credit: Instagram)

Anil Kapoor Birthday: बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सर्व चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनिल कपूरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. सध्या अनिल कपूर आपल्या 'जुग जुग जीओ' (Jug Jugg Jeeyo) या नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत त्यांनी चित्रपटाच्या सेटवर केक कापून आपला 64 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी नीतू कपूर (Neetu Kapoor), कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) आदी सेलिब्रिटी उपस्थित होते. वरुणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अनिल कपूरच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत आहे.

दरम्यान, वरुण धवन, नीतू कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर चित्रपटाचे शुटिंगही थांबविण्यात आले होते. मात्र, कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर हे सर्व कलाकार सेटवर परतले आहेत. या सर्वांनी अनिल कपूरचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. (हेही वाचा - Khushi Kapoor Instagram Photos: श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर ने इन्स्टाग्राम अकाऊंट केले पब्लिक; पहा तिचे ग्लॅमरस फोटोज)

आज अनिल कपूरसाठी डबल सेलिब्रेशन आहे. कारण, आज त्यांचा AK vs AK हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनिल कपूर अनुराग कश्यपसोबत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आज पहिल्यांदा अनिल कपूरच्या वाढदिवशी त्यांचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनिल कपूरची दोन्ही मुलं म्हणजे सोनम आणि हर्षवर्धन दिसणार आहेत.