Khushi Kapoor Instagram Photos: श्रीदेवीची छोटी मुलगी खुशी कपूर ने इन्स्टाग्राम अकाऊंट केले पब्लिक; पहा तिचे ग्लॅमरस फोटोज
खुशी कपूर आणि जाह्नवी कपूर (Photo Credits: Instagram)

Khushi Kapoor Instagram Photos: श्रीदेवीची मुलगी जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर इंडस्ट्रीमध्ये आपल्या सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाने लोकांना प्रभावित करताना दिसत आहेत. एकीकडे मोठी मुलगी जाह्नवीने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले आहे. आता धाकटी मुलगी खुशी कपूर सुद्धा आपल्या मोहक शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतना दिसत आहे. खुशीने नुकतेच तिचे इंस्टाग्राम अकाऊंट सार्वजनिक केले आहे. आतापर्यंत खूशी कपूरचे इन्स्टाग्राम अकाऊंट खासगी होते. मात्र, तिने आता ते पब्लिक केले आहे. यामुळे कोणताही इन्स्टाग्राम वापरकर्ता खुशीचे फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतो. सध्या खुशीच्या इन्स्टाग्राम अकाउंटला एक लाख 8 हजार जण फॉलो करत आहेत. खुशीच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

खुशीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत: चे अनेक हॉट फोटोज शेअर केले आहेत. ज्यात तिचं सौंदर्य पाहण्यासारख आहे. असं म्हटलं जात आहे की, खुशीला आपली आई आणि मोठ्या बहिणीप्रमाणे अभिनेत्री होण्याऐवजी मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. (हेही वाचा - Mission Manju: सिद्धार्थ मल्होत्रा च्या 'मिशन मंजू' या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण)

खुशी कपूर ग्लॅमरस फोटो - 

दरम्यान, खुशीने आपले इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोज प्रचंड व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर खुशीच्या फोटोंजना खूपच पसंती मिळत आहे. खुशी 20 वर्षांची आहे. परंतु, तिचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज काढणं चाहत्यांना अवघड होत आहे. खुशीची मोठी बहिण जाह्नवी कपूर 23 वर्षांची आहे. 2018 मध्ये श्रीदेवीच्या निधनानंतर जाह्नवीने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.