Kesari चित्रपटातील 'Teri Mitti' या लोकप्रिय गाण्यावर चोरीचा आरोप; जाणून घ्या काय म्हणाले गीतकार Manoj Muntashir
Manoj Muntashir (Photo Credits: Instagram)

गीतकार मनोज मनोज मुंताशीर (Manoj Muntashir) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर कविता चोरल्याचा आरोप आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की, मनोज मनोज मुंताशीर यांनी 2019 मध्ये त्यांच्या 'मेरी फितरत है मस्ताना' या पुस्तकात 'मुझे कॉल करना' ही कविता लिहिली आहे, मात्र ती त्यांची स्वतःची नसून त्यांनी तिचे हिंदीमध्ये भाषांतर करून आपल्या नावाने पुस्तकात छापले आहे. हा वाद मिटतोय न मिटतोय तोपर्यंत मनोज यांच्यावर नवा आरोप होत आहे की, केसरी (Kesari) चित्रपटातील त्यांचे गाणे ‘तेरी मिट्टी’ (Teri Mitti) हे देखील कॉपी केलेले आहे.

सोशल मिडियावर चर्चा आहे की, त्यांनी तेरी मिट्टी हे गाणे 2005 मधील एका पाकिस्तानी गाण्यावरून कॉपी केले आहे. आता या आरोपांवर मनोज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ई-टाइम्सशी बोलताना या आरोपांवर मनोज म्हणाले, 'जो कोणी माझ्यावर हे आरोप करत आहे, त्यांनी त्या गाण्याचे व्हिडिओ शेअर करावेत. आमच्या केसरी चित्रपटाचे गाणे रिलीज झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी असे एक पाकिस्तानी गाणे यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. तसेच, त्याची गायिका पाकिस्तानी नसून भारतीय लोक गायिका गीता रबारी आहे.' (हेही वाचा: Bappi Lahiri यांचा आवाज COVID 19 मुळे गेल्याच्या बातम्या अफवा; पहा त्यांच्या आवाजातील गाणं (Watch Video)

या आरोपांबाबत मनोज मनोज मुंताशीर यांनी असेही म्हटले आहे की, जर त्यांचे 'तेरी मिट्टी' हे गाणे कोणत्याही गाण्याची कॉपी ठरले तर ते कायमचे लिहिणे बंद करतील. एवढेच नाही तर त्यांनी एका मुलाखतीत असेही म्हटले आहे की, राष्ट्रवादी असल्याची त्यांना शिक्षा मिळत आहे.

या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, मनोज मनोज मुंताशीर यांनी ट्विटरवर म्हटले होते-'200 पानांच्या पुस्तकातून आणि 400 चित्रपट-चित्रपट नसलेल्या गाण्यांमधून फक्त 4 ओळी सापडल्या? खूप आळशी आहात. अजून काही ओळी शोधा, माझ्याही व इतर लेखकांच्याही. त्यानंतर निवांत उत्तर देईन.' अचानक त्यांच्यावर असे आरोप का केले जात आहेत, असे मुलाखतीत विचारले असता, त्यांनी उत्तर दिले- 'लोक माझ्यावर मुद्दाम हल्ला करत आहेत कारण मी मुघलांच्या विरोधात एक व्हिडिओ बनवला होता.’