तैमुर, इनाया आणि अबराम या स्टार किड्सचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला असतो. शाहरुख खानचा (Shahrukh Khan) चिमुकला अबराम खान (Abram Khan) अलिकडेच ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya RaiBacchan) मुलगी आराध्या बच्चनच्या (Aaradhya Bacchan) बर्थडे पार्टीला गेला होता. पण तो पार्टीतून निघत असताना फोटोज काढण्यासाठी फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली. तेव्हा या चिमुकला फोटोग्राफर्सवर चिडला आणि 'नो पिक्सर्स' असे बोलू लागला तसंच आपला चेहरा लपवू लागला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनी अबराम खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आणि त्यात त्यांनी लिहिले की, "छोट्या अबरामला मी त्याच्या आजोबा आहे असे वाटते. यात त्याला कोणतीही शंका नाही. म्हणूनच आजोबा आमच्यासोबत का राहत नाहीत याचे त्याला आश्चर्य वाटते." आजोबा आमच्यासोबत का राहत नाहीत?- चिमुकल्या अबरामचा बिग बींना प्रश्न
अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर शाहरुख खानने केलेल्या कमेंटने चाहत्यांचे मन जिंकले.